Chhagan Bhujbal : महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आज नागपूरमध्ये होणार आहे. एकूण 39 आमदार आज मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP Cabinet Minister List) अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद निश्चित झाले आहे. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मात्र मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. 


नागपूर येथील देशपांडे हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडत आहे. सर्व आमदारांना या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी बोलवण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह सर्वच आमदार उपस्थित आहेत. मात्र, या कार्यक्रमाला छगन भुजबळ गैरहजर आहेत. छगन भुजबळ यांचा पत्ता कट होऊन सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. 


मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री


मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या राजभवनात दुपारी तीननंतर हा शपथविधी होणार असून राजभवनाच्या प्रशस्त लॉनवर याची जोरदार तयारी करण्यात आलीय. याआधी 1991 मध्ये शिवसेनेतल्या फुटीनंतर नागपुरात शपथविधी झाला होता. यानंतर 33 वर्षांनंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी हा नागपुरात होणार आहे.


नागपुरात शपथविधीसाठी मोठी तयारी


राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet expansion) नागपुरमध्ये हा दुसरा शपथविधी पार पडत आहे. आधी 1991 साली छगन भुजबळ यांनी शिवसेनेचा त्याग करून काँग्रेस सोबत गेल्यानंतर त्यांचा नागपुरात तातडीने शपथविधी घेतला गेला होता. त्यानंतर आता दुसर्‍यांदा महायुती सरकारचा नागपुरात शपथविधी होत आहे. त्या शपधविधीची मोठी तयारी देखील करण्यात आली आहे.



इतर महत्त्वाच्या बातम्या 


Maharashtra Cabinet Expansion: महायुतीचे मंत्री ठरले! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून मंत्रि‍पदासाठी कोणा कोणाला फोन; संपूर्ण यादी एका क्लिकवर!


देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 1-2 नव्हे तर तब्बल 19 नवे चेहरे, कोणत्या पक्षातून कोण शपथ घेणार?