मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. नागपुरात आज अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दुपारी 4 वाजता हा शपथविधी समारोह पार पडेल. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिपद मिळण्यासाठी नेते मंडळी जोर लावत होते. काहीही झालं तरी मलाच मंत्रिपद मिळणार, असा दावा अनेक नेते करत होते. दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अनेक मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांनी जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद देण्याचं ठरवलंय. मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्या सरकारमध्ये एक किंवा दोन नव्हे तर तब्बल 19 नवे चेहरे असण्याची शक्यता आहे.
कोणत्या पक्षाच्या किती नव्या नेत्यांना संधी?
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या नेत्यांना संधी मिळण्याच शक्यता आहे. महायुतीच्या सरकारमध्ये एकूण तीन पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांनी आपल्या सर्व नेत्यांना संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अनेक नव्या चेहऱ्यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपा पक्षातर्फे एकूण 9 नवे चेहरे असतील. राष्ट्रवादी पक्षात एकूण चार चेहरे नवे असतील. तर शिवसेना पक्षात एकूण 6 नव्या नेत्याना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
फडणवीस यांच्या सरकारमध्ये कोणते नवे चेहरे असणार?
1) नितेश राणे- भाजप
2) माधुरी मिसाळ- भाजप
3) जयकुमार गोरे- भाजप
4) शिवेंद्रराजे भोसले- भाजप
5) मेघना बोर्डीकर- भाजप
6) पंकज भोयर- भाजप
7) आकाश फुंडकर- भाजप
8) अशोक उईके- भाजप
9) संजय सावकारे- भाजप
राष्ट्रवादी पक्षाकडून कोणत्या नव्या नेत्यांन मंत्रिपद
10) नरहरी झिरवळ- राष्ट्रवादी
11) मकरंद जाधव पाटील- राष्ट्रादी
12) बाबासाहेब पाटील- राष्ट्रवादी
13) इंद्रनील नाईक- राष्ट्रवादी
शिवसेना पक्षाकडून कोणत्या नव्या नेत्याला संधी
14) प्रताप सरनाईक- शिवसेना
15) भरत गोगावले-शिवसेना
16) योगेश कमद- शिवसेना
17) प्रकाश आबीटकर- शिवसेना
18) संजय शिरसाट शिवसेना
19) आशिष जैस्वाल- शिवसेना
हेही वाचा :
Maharashtra Cabinet Expension Live Updates : नितीन गडकरी करणार देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत