पुणे : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Maharashtra Cabinet expansion) अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहेत अनेक नेत्यांना शपथविधीसाठी फोन केल्याची माहिती आहे काही आमदार नागपुरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आज रविवारी संध्याकाळी चार वाजता नागपुरातील राजभवनावर शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे त्यासाठीची तयारी राजभवनावर करण्यात आली आहे सातत्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या  (Maharashtra Cabinet expansion) वेगवेगळ्या तारखा समोर येत होत्या मात्र आजच्या तारखेवर शिक्कामोर्तब झाला आहे आणि आज चार वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नऊ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अकरा त्यासोबतच भाजपकडून 20 ते 21 आमदार शपथ घेणार आहेत. शपथविधीसाठी संभाव्य मंत्री नागपुरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. काही नेत्यांना फोन गेले आहेत, तर काही नेत्यांनी नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. तर पुण्यातील देखील काही आमदारांना शपथविधीसाठी फोन आल्याची माहिती आहे.  (Maharashtra Cabinet expansion) 


मंत्रिमंडळाचा शपथविधी काही तासांवर आला आहे, तरी देखील कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार हे स्पष्ट झालेले नाही, अद्याप या नावांबाबत मोठी गुप्ताता बाळगण्यात आलेली आहे. काही आमदारांना फोन आले आहेत तर काहींना अद्याप फोन आले नसल्याने मंत्रिमंडळात नक्की कोणाची वर्णी लागणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्यातील अद्याप 3 आमदारांना फोन आल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांना कोणते खाते मिळणार, याची उत्सुकता आहे. भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांना देखील मंत्रीपदासाठीचा फोन आल्याची माहिती आहे. पर्वती मतदारसंघातून  चौथ्यांदा आमदार झालेल्या माधुरी मिसाळ यांना देखील मंत्रीपदासाठी फोन आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे इंदापुरचे आमदार दत्तमामा भरणे यांना देखील फोन आल्याची माहिती आहे.  (Maharashtra Cabinet expansion) 


या नावांची चर्चा 



भोसरी मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झालेले महेश लांडगे यांचं देखील नाव मंत्रिपदासाठी चर्चेत होतं.  पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि मावळमधूनविक्रमी मतांनी निवडून आलेले सुनील शेळके यांच्या नावांची चर्चा होती. दिलीप वळसे पाटील यांचे नाव चर्चेत असलं तरी अद्याप त्यांच्या देखील मंत्रीपदाबाबतची माहिती समजू शकलेली नाही. शिवसेनेकडून पुरंदर मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झालेले माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचंही नाव मंत्रिपदाच्या चर्चेत होतं. दौंड तालुक्यातून तिसऱ्यांदा आमदार झालेले राहुल कुल हे देखील चर्चेत होते. मात्र, अद्याप मंत्रीपदाची नावे गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या शपथविधीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


भाजपकडून कोणा कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन-


(BJP Cabinet Minister List)


नितेश राणे 
शिवेंद्रराजे भोसले 
चंद्रकांत पाटील 
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा 
गिरीश महाजन 
जयकुमार रावल 
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
जयकुमार गोरे, 
अतुल सावे,
माधुरी मिसाळ,
चंद्रशेखर बावनकुळे,
अशोक उईके,
आकाश फुंडकर,
संजय सावकारे


शिवसेनेकडून कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन-


(Shivsena Cabinet Minister List)
उदय सांमत
प्रताप सरनाईक
शंभूराज देसाई
योगश कदम
आशिष जैस्वाल
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
दादा भूसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट 


राष्ट्रवादीकडून कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन-


(NCP Cabinet Minister List)


आदिती तटकरे 
बाबासाहेब पाटील 
दत्तमामा भरणे 
हसन मुश्रीफ 
नरहरी झिरवाळ
मकरंद पाटील
इंद्रनील नाईक