अहमदनगर:  महाराष्ट्र भाजपमधील (Maharashtra BJP)  नाराज पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednaga News) शेवगावचे जवळपास शंभर कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज सामूहिक राजीनामे देणार आहेत. स्थानिक पातळीवरील राजकारण, नगर दक्षिणचे खासदार सुजय विखेंना पुन्हा दिलेली उमेदवारी ही राजीनाम्यामागील कारणं असल्याची माहिती मिळतेय. कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे नाराजी कळवली. आज सकाळी 11 वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय.


काय म्हटले आहे पदाधिकाऱ्यांनी नेमकं पत्रात?


मी सुनिल रामचंद्र राराने रा. शेवगाव जि. अहमदनगर गेल्या 45 वर्षापासून पक्ष रचनेत मी व माझा परिवार काम करत आलो आहोत. माझे पिताश्री व मातोश्रींचा १९४२ च्या आणीबाणीच्या काळात आंदोलनात सक्रिय सहभाग होता तसेच अयोध्या येथील कार सेवेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. या सर्व बार्बीचा आम्हास गर्व आहे.


मी भारतीय जनता पार्टीच्या रचनेत शेवगाव शहर सरचिटनीस, शहर उपाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस असे अनेक पदावरती सेवा दिली आहे.  अटल बिहारी वाजपेयी, स्व. गोपिनाथ मुंडे साहेब, स्व. दिलीप गांधी साहेब, स्व. राजीवजी राजळे साहेब यांच्या प्रेरणेने काम करत आलो आहोत. परंतु येत्या २०२४ लोकसभा निवडणुकीकरता विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना अहिल्यानगर लोकसभा मतदार संघ ३७ उमे‌दवारी दिल्याने भारतीय जनता पार्टीची नगर दक्षिण जाग ही धोक्यात येवू शकते. खासदार निवडुन गेल्यानंतर त्यांचा मतदार संघाशी संपर्क मोठया प्रमाणात तुटला आहे. नागरिकांचे, कार्यकत्यांचे फोन न उचलणे, समोरच्या व्यक्तीचे म्हणने ऐकून न घेता त्याला सुमार दर्जाचा सल्ला देणे, पार्टी म्हणजे मी, मी म्हणजे मतदार संघातील जनता असे म्हणून जनतेला, मतदाराला गृहित धरणे सिर्फ मुझे गिनो" या स्वभावामुळेच मागे जिल्ह्यात पाट आमदारांना घरी बसविण्याचे पुण्य पार्टीच्या पदरात टाकण्याचे काम यांनी केले आहेत. तसेच मतदार संघात पायाभूत सेवेचा फज्जा उडलेला आहे. शेवगाव शहर व ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, रस्ते,  वैद्यकिय संस्था असतानाही जिल्हयाच्या बऱ्याच तालुक्यात मलेरिया, डेंग्यू आदी रोगांचा प्रादुर्भाव  पाहायला मिळतात.


निष्ठावंत म्हणून भविष्यात पक्ष शुद्धिकरणासाठी काम करणार


महसुल विभागातील लोकांच्या जीवनावश्यक समस्या ही पैसे दिल्याशिवाय सुटण्यास तयार नाही. ५ वर्ष मतदार संघात संपर्क न ठेवणारे आमचे खासदार साहेब ऐन निवडणुकीच्या तोंडावर साखर, दाळ वाटप करणे.  नागरीकांना शिर्डी दर्शन, लहान-मोठे सांस्कृतीक कार्यक्रम असे केविलवाणे प्रकार करताना दिसत  आहे. आत्ता निवडणुकीच्या तोंडावर साखर, दाळ वाटप करण्या ऐवजी किमान गुळासारखे गोड बोलणे जरी ठेवले असते तरी जनता सोबत राहिली असती परंतु आज निवडणुकीच्या अगोदरच त्यांच्या पराभवाची चिन्हे दिसत आहेत. भाजपा. ४०० जागा पारही करेल परंतु त्यामध्ये नगर-दक्षिणची जागा नसणार याचे दुःख मतदार संघात प्रत्येक कार्यकत्याला वाटत आहे. फक्त पैसा, सत्ता, दंडेलशाही यामुळे उघडपणे कोणी बोलण्यास तयार नाही ही माझी भावना नसून नगर-दक्षिण मतदार संघातील हजारो भाजप निष्टावंताची भावना प्रातिनिधीक स्वरुपात मी मांडत आहे.  उमे‌द्वारीच्या निषेधार्थ मी माझ्या पक्षाने दिलेल्या पर्दाचा राजीनामा देत आहोत. पक्षाचा प्राथमिक सदस्य  आम्ही निष्ठावंत म्हणून भविष्यात पक्ष शुद्धिकरणासाठी काम करत राहणार आहोत. 


हे ही वाचा :


Baramati Lok sabha: तर अजित पवार असणार बारामतीमधून उमेदवार? खबरदारीसाठी अजित पवार गटाचा प्लॅन बी तयार