Baramati Lok Sabha: सुनेत्रा पवारांचा सध्या दणक्यात प्रचार सुरु असल्याचं दिसत आहे. त्यातच सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विविध गावभेटी घेताना दिसत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुनेत्रा पवार  नामनिर्देश पत्र विकत घेतलं  आहे.18 एप्रिलला सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.  यावेळी अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 


अजित पवार डमी उमेदवार असण्याची शक्यता


बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असलेल्या सुनेत्रा पवारांच्या नावे पुणे जिल्हाधिकाऱी कार्यालयातून अर्ज खरेदी करण्यात आलाय.  त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे  देखील अर्ज खरेदी करण्यात आलाय.   त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सुनेत्रा पवारांबरोबर अजित पवार देखील डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. बारामती मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 12  मार्चपासून सुरूवात झाली. अर्ज भरण्याची मुदत 19  एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.18 एप्रिलला सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नावे अर्ज घेतले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे आणि सचिन दोडके यांनी अर्ज घेतले आहेत. याशिवाय बहुजन समाज पार्टी, देश जनहित पार्टी, अखिल भारतीय जनता दल, रिपाइं आदी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत, असे बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.  


बारामती काका की पुतण्याची?


ज्या पवार कुटुंबाने गेल्या साडेपाच दशकांपासून महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणामध्ये आपलं दबदबा ठेवला, कौटुंबिक नाती किती महत्त्वाची आहे हे प्राधान्याने दाखवून देण्याचा प्रयत्न केला, राजकारण घरापर्यंत कधी येऊ दिले नाही ते आज कुटुंबच पूर्णतः राजकारणामध्ये विभागलं गेलं आहे. अजित पवार यांनी बंडाळी केल्यानंर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या वाट्याला गेलं आहे. त्यामुळे बारामतीतील लढाई ही पहिल्यांदाच या सर्व घडामोडीनंतर असणार आहे.त्यामध्ये आता थेट बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत म्हणण्यापेक्षा अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी बारामतीसह (Baramati Loksabha) पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील राजकीय अस्तित्वाची असेल. या लढाईत बारामतीची काका की पुतण्याची याचा सुद्धा फैसला होणार आहे. 


हे ही वाचा :


Sharad Pawar: खरा वारसदार कोण? शरद पवारांकडून जुना व्हिडीओ शेअर