एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil : उमेदवार पाडायचे की लढवायचे याचा निर्णय समाज बांधवांसमोर निर्णायक बैठकीत होणार; मनोज जरांगेंचा इशारा  

मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर आता निवडणुकीत उमेदवार पाडायचे की लढवायचे याचा निर्णय उद्या घेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.

जालना : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच आपला संताप व्यक्त केला. आता या निवडणुकीमध्ये निर्णायक मतदान हे मराठ्यांचे आहे. आता रणशिंग फुंकले आहे. लढाईला उतरायचं म्हणजे तलवार काढावी लागेल. सरकारने मराठा आरक्षणाबाबत आमची आशा संपवली असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, मनोज जरांगे पाटील आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2024) उमेदवार पाडायचे की लढवायचे याचा निर्णय समाज बांधवांसमोर निर्णायक बैठकीत उद्या (ता.20 सप्टेंबर) घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  

समाजबांधवांसमोरच आम्ही निर्णय जाहीर करणार- मनोज जरांगे 

विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे की उमेदवार उभे करत लढायचं यासाठीच समाज बांधवांसमोर उद्या निर्णायक बैठक होणार आहे. यावेळी या बैठकीला जेवढे समाजबांधव येतील त्यांच्या समोरच आम्ही निर्णय जाहीर करणार.अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. राज्यात महाविकास आघाडी असो की महायुती त्यांना संताजी धनाजी सारख पाण्यात मीच एकटाच दिसतो. माझ्यावर कोणाचाच अस्त्र चालू शकत नाही.त्यामुळे उद्या वेळ आली तर मी मराठ्यांसाठी मी मरेलही. सरकारकडे आणि विरोधकांकडे शेवटच अस्त्र तेच आहे. एक तर मला मारून टाकावे लागल. मात्र मी मरेल पण पैशावर आणि पदावर फुटू शकत नाही. माझ्या जवळच्या असणार्‍या लोकांना देऊन जर तुम्ही डाग लावण्याचा प्रयत्न केला असल तर तो घेणारा संपणार आणि देणारा सुद्धा संपवणार, असा इशारा ही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे.

माझ्या विरोधात खूप मोठा डाव रचला आहे-  मनोज जरांगे 

लढायचं ठरलं तर आमच्यासाठी वेळ कमी नाही. आमची गेल्या 13 महिन्यापासून तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडे देखील टफ उमेदवार आहेत. मात्र यातून त्यांना द्यायचा एक आहे. तसेच माझ्याकडे पण लय इच्छुक आहेत. आम्ही एक जरी उमेदवार दिला 100 जरी इच्छुक असले तर सर्वजण एकाचाच बाजूला उभे राहतील. 20 आणि 25 दिवसात माझ्या विरोधात खूप मोठा डाव रचला आहे. केंद्र आणि राज्यातल्या कोणत्यातरी एका नेत्याकडे  ताकद पुरवली आहे. त्याच्या पाठीशी कॅम्पिंनिग होणार, वेळ आली तर त्याच्या नावाची  समाजासमोर चिरफाड करणार. मला या चळवळीतून खतम करायचा, गैरसमज कसा फैलावयचा याची कंपनिग होणार आहे. निर्णय उद्या काय होईल माहिती नाही. पण जे काही ठरेल एक ही गरीब सामान्य ओबीसी सहित मी त्यांना वापस जाऊ देणार नाही. 2024 मध्ये 75 वर्षात बघितलेले स्वप्न साकार होईल, त्यांचा न्यायचा दिवस येईल. मी आतापर्यंत काही गाव खेड्यातल्या ओबीसीला दुखावलं नाही, मी दुखावणार असतो तर त्याच टायमाला बोललो असतो फक्त मी त्या येवल्यावाल्याला बोललो, त्याच्या समाजाला सुद्धा नाही, अशी स्पष्टोक्ती मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या

व्हिडीओ

Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
Gold Price : सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
Embed widget