महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मत देऊ नका, मी संपुर्ण राज्याला साद घालतोय, 'त्या' वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
Uddhav Thackeray : मी पुर्ण महाराष्ट्रासाठी साद घालतोय. महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मतं देऊ नका, असं अवाहन केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray : हुकुमशाही, गुंडागर्दी, दडपशाही रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साथ द्यावी. मतभेत असले तरी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सिल्लोडमध्ये केलं होत. यावेळी त्यांनी काहीशी भाजप (BJP) बरोबर नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. याबाबत उद्धव ठाकरेंना विचारला असता ते म्हणाले की, मी पुर्ण महाराष्ट्रासाठी साद घालतोय. महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मत देऊ नका, असं अवाहन केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
मला गुजरातबद्दल राग नाही. इथे कधी गुजराती मराठी वाद झाला नाही. मात्र, हे लोक तशी भिंत बांधत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजप आणि संघाच्या तमाम कार्यकर्त्यांना साद घालतो की, हा संकरीत पक्ष तुम्हाला मान्य आहे का? भ्रष्टाचाऱ्यांनी संकरीत केलेला पक्ष मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. प्रमोदजी, गोपीनाथजी, अडवाणींवेळी भाजप नितिमत्ता पाळणारा पक्ष होता असेही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एबीपी माझाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार टीका केली.
शिवबंधन माझ्या हातातच काय, माझ्या मनात पण आहे
शिवबंधन माझ्या हातातच काय, माझ्या मनात पण असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रद्रोह्यांसोबत मी जाणार नाही. मी महाराष्ट्रासोबत बांधील आहे. माझ्या वडिलांनी महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी शिवसेनेची स्थापना केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. माझं नातं महाराष्ट्राशी आहे. महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांना मी मदत करु शकत नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत ही महाराष्ट्राची इच्छा आहे. मात्र तुम्ही एकत्र का आला नाहीत? असे विचारले असता उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, त्यांना महाराष्ट्राचा लुटारु मुख्यमंत्री व्हावा वाटत असेल, तर त्यांच्यासोबत युती होऊ शकत नाही. लुटारुंना मदत करणाऱ्यांना मदत केली तर तो विश्वासघात होईल. महाराष्ट्र द्रोह्यांना मदत करणार नाही हे जर त्यांनी जाहिर केलं असतं तर वाटेल ते केलं असतं. नात्याची गफलत करु नका. जनतेशी द्रोह करणाऱ्याला आम्ही मदत करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
मतभेद असले तरी भाजप कार्यकर्त्यांशी बोलायला तयार, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, गुंडागर्दी रोखण्यासाठी साथ द्या