एक्स्प्लोर

Lok Sabha Election 2024 : 48 जागा, 48 उमेदवार; मविआ उमेदवारांची संपूर्ण यादी

MVA Seat Sharing : महाविकास आघाडीने जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला आहे. यामध्ये ठाकरे गटाला 21 जागा, काँग्रेसला 17 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा देण्यात आल्या आहेत.

मुंबई : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचा (Seat Sharing) तिढा अखेर सुटला आहे. मविआने संयुक्त पत्रकार परिषदेत आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) अंतिम जागावाटपावर शिक्कामोर्तब केला आहे. गेले कित्येक दिवस मविआच्या जागावाटपाचं घोंगडं भिजत होतं. मात्र, मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं चित्र अखेर स्पष्ट झालं आहे. त्यानुसार, मविआमध्ये शिवसेना 21 जागांसह मोठा भाऊ ठरला असून काँग्रेस 17 जागांसह मधला तर शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागांसह धाकटा भाऊ ठरला आहे. त्यानंतर, आज महायुतीचाही जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे, केवळ पालघर जागेचा तिढा अद्याप कायम असून तोही आज किंवा उद्या मिटण्याची शक्यता आहे. महायुतीत भाजपा मोठा भाऊ ठरला असून शिवसेना मधवा तर राष्ट्रवादी धाकटा भाऊ ठरला आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागा रासपलाही देण्यात आली आहे.  

मविआचा 21-17-10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला 

मविआने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पत्रकार परिषदेत सर्व 48 जागांवरील चित्र स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीने 21-17-10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 21 जागा, काँग्रेसला 17 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा देण्यात आल्या आहेत.

शिवसेना ठाकरे पक्ष - 21 जागा

जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदर्ग, बुलढाणा, हातकलंगणे, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य.

काँग्रेस - 17 जागा

नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर, पुणे, लातूर, सोलापूर, रामटेक, कोल्हापूर.

राष्ट्रवादी शरद पवार पक्ष - 10 जागा

बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड.

महायुतीतील जागावाटपाचा 28-14-5 असा फॉर्म्युला 

भाजपा 28

नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नांदेड, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, लातूर, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, अहमदनगर, बीड, धुळे, दिंडोरी, भिवंडी, पुणे, मुंबई उत्तर, उत्तर-मध्य, उत्तर-पूर्व.

शिवसेना 14

ठाणे, कल्याण डोंबिवली, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, मावळ, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, रामटेक, हातकणंगले, कोल्हापूर, शिर्डी, संभाजीनगर, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेस 4+1

बारामती, धाराशिव, रायगड, शिरुर आणि परभणी

48 मतदार संघातील मविआ उमेदवारांची संपूर्ण यादी

  मतदारसंघ महायुती
(भाजप, शिंदे आणि अजित)
महाविकास आघाडी
(उबाठा, शरद पवार, काँग्रेस)
वंचित अपक्ष/इतर
1 नंदुरबार डॉ. हिना गावित गोवाल पाडवी    
2 धुळे सुभाष भामरे शोभा बच्छाव अब्दुल रहमान  
3 जळगाव स्मिता वाघ करण पवार    
4 रावेर रक्षा खडसे रवींद्र पाटील संजय ब्राम्हणे  
5 बुलडाणा प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर    
6 अकोला अनुप धोत्रे अभय पाटील    
7 अमरावती नवनीत राणा बळवंत वानखेडे   आनंदराज आंबेडकर
8 वर्धा रामदास तडस अमर काळे    
9 रामटेक राजू पारवे रश्मी बर्वे    
10 नागपूर नितीन गडकरी विकास ठाकरे    
11 भंडारा-गोंदिया सुनील मेंढे डॉ. प्रशांत पडोळे    
12 गडचिरोली-चिमूर अशोक नेते डॉ. नामदेव किरसान    
13 चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार प्रतिभा धानोरकर    
14 यवतमाळ - वाशिम राजश्री पाटील संजय देशमुख    
15 हिंगोली बाबूराव कदम नागेश पाटील आष्टीकर डॉ. बी.डी. चव्हाण  
16 नांदेड प्रताप पाटील चिखलीकर वसंतराव बळवंतराव चव्हाण    
17 परभणी महादेव जानकर संजय जाधव    
18 जालना रावसाहेब दानवे कल्याणराव काळे प्रभाकर बखले  
19 औरंगाबाद संदीपान भुमरे चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील  
20 दिंडोरी डॉ. भारती पवार भास्करराव भगरे    
21 नाशिक हेमंत गोडसे राजाभाई वाजे    
22 पालघर उमेदवार ठरलेला नाही भारती कामडी    
23 भिवंडी कपिल पाटील सुरेश म्हात्रे    
24 कल्याण श्रीकांत शिंदे वैशाली दरेकर    
25 ठाणे नरेश म्हस्के राजन विचारे    
26 मुंबई-उत्तर पियुष गोयल काँग्रेस -उमेदवार घोषणा नाही    
27 मुंबई - उत्तर पश्चिम रविंद्र वायकर अमोल कीर्तीकर    
28 मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) मिहीर कोटेचा संजय दिना पाटील    
29 मुंबई उत्तर मध्य उज्ज्वल निकम वर्षा गायकवाड अबुल हसन खान  
30 मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे अनिल देसाई    
31 दक्षिण मुंबई यामिनी जाधव अरविंद सावंत    
32 रायगड सुनील तटकरे अनंत गीते    
33 मावळ श्रीरंग बारणे संजोग वाघेरे-पाटील    
34 पुणे मुरलीधर मोहोळ रविंद्र धंगेकर    
35 बारामती सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे    
36 शिरुर शिवाजी आढळराव डॉ. अमोल कोल्हे    
37 अहमदनगर सुजय विखे पाटील निलेश लंके    
38 शिर्डी सदााशिव लोखंडे भाऊसाहेब वाघचौरे    
39 बीड पंकजा मुंडे बजरंग सोनवणे    
40 धाराशिव अर्चना पाटील ओमराजे निंबाळकर    
41 लातूर सुधाकर श्रृंगारे शिवाजीराव काळगे नरिसिंह उदगीरकर  
42 सोलापूर राम सातपुते प्रणिती शिंदे राहुल काशिनाथ गायकवाड  
43 माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर राष्ट्रवादी -उमेदवार घोषणा नाही रमेश बारसकर  
44 सांगली संजयकाका पाटील चंद्रहार पाटील    
45 सातारा उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे मारुती जानकर  
46 रत्नागिरी-सिंधुदुर्ग शशिकांत शिंदे विनायक राऊत काका जोशी  
47 कोल्हापूर संजय मंडलिक शाहू महाराज छत्रपती    
48 हातकणंगले धैर्यशील माने सत्यजीत पाटील दादागौडा चवगोंडा पाटील  

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget