सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून माढा या लोकसभा मतदारसंघाची (Madha Constituency) विशेष चर्चा आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) या जागेवर कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, आता हा सस्पेन्स जवळजवळ संपला आहे. महाविकास आघाडीतर्फे माढ्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जनाकर यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. कारण शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाट्याला आलेल्या 9 जागांची संभाव्य यादी समोर आली आहे. यामध्ये माढा या मतदारसंघाचाही समावेश आहे. माढ्यासह बारामती, रावेर, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, दिंडोरी, बीड, वर्धा या जागांदेखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्याचे म्हटले जात आहे. 


माढ्यात निंबाळकर विरुद्ध जानकर?


शरद पवार माढ्यातून जानकर यांनाच उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यासाठीची चाचपणी केली जात होती. शरद पवार यांच्याकडून जानकर यांच्या नावाचा विचार चालू झाल्यानंतर खुद्द महादेव जानकर यांनीदेखील हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांनी भाजपाचे नाराज नेते मोहिते पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील संजीवबाबा निंबाळकर यांची भेट घेतली होती. दुसरीकडे भाजपाकडून रणजितसिंह निंबळकर हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे येथे जानकर विरुद्ध निंबाळकर अशी लढत पाहायला मिळणार आहे.


जानकरांना उमेदवारी देण्यामागे पवारांचं गणित काय?


गेल्या अनेक दिवसांपासून माढा या मतदारसंघाचा सपेन्स कायम आहे. या जगेवरून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जनाकर यांना उमेदवारी देण्याचा शरद पवार यांच्याकडून विचार केला जात आहे. माढा तसेच बारामती या मतदारसंघांत ओबीसी समाजाच्या मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे माढ्यात महादेव जानकरांना उतरवून बेरजेचं राजकारण करण्याचा शरद पवार यांचा विचार आहे. पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना उमेदवारी देणं हा एका प्रकारे महायुतीसाठी धक्का म्हटले जात आहे. कारण जानकर हे ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या या निर्णयाचा सातारा, माढा, बारामती लोकसभा मतदारसंघात परिणाम पडू शकतो.


शरद पवार यांच्या नावाचीही होती चर्चा


माढा मतदारसंघातून खुद्द शरद पवार हे निवडणूक लढवणार आहेत, अशी चर्चा रंगली होती. मात्र खुद्द शरद पवार यांनीच या चर्चेवर पडदा पाडला होता. मी निवडणूक लढवावी अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र ही निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले होते. त्यानंतर शरद पवार नसतील तर मग माढ्यातून कोणालात तिकीट दिले जाणार? असे विचारले जात होते. शरद पवार मात्र महादेव जानकर यांनाच तिकीट देण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या :


Madha Loksabha: माढ्यात अफवांचा बाजार, भाजपची डोकेदुखी वाढली; शरद पवारांच्या होल्डिंग गेममुळे महायुती जेरीस