सातारा : लोकांना गायब करण्याची काँग्रेसची (Congress) परंपरा आहे, असा गंभीर आरोप सातारा लोकसभेचे (Satara Lok Sabha Election 2024) भाजपचे उमेदवारी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केला. राजेश पायलट, वायएसआर रेड्डी, माधवराव शिंदे यांच्या मृत्यूबाबत उदयनराजे यांनी अप्रत्यक्षपणे शंका व्यक्त केली आहे. ते साताऱ्यात एका पत्रकार परिषदेत बोलत होते. राजेश पायलट यांचा मृत्यू रस्त्यावरील अपघातात झाला होता. तर वायएसआर रेड्डी आणि माधवराव शिंदे यांचा मृत्यू हा हेलिकॉप्टर अपघातात झाला होता. दरम्यान, उदयनराजेंच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 


उदयनराजे नेमकं काय म्हणाले?


उदयनराजे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसवर गंभीर टीका केली. काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट हे विचारांनी चांगले होते. ते अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा अर्ज भरायला निघाले होते. त्यांचा अपघात झाला. माधवराव शिंदे यांचाही अपघात झाला. वायएसआर रेड्डी फार प्रसिद्ध होते. त्यांचाही अपघात झाला, असं विधान करत उदयनराजे यांनी काँग्रेसवर शंका उपस्थित केली. 


बाळासाहेब थोरात यांचं प्रत्युत्तर


तर उदयनराजे यांच्या याच विधानावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलंय. त्यांचं हे विधान तर्कहीन आहे, असं थोरात म्हणाले. "खरं म्हणजे उदयनराजे यांनी काहीही बोलावं आणि आम्ही त्याला उत्तर द्यावं, असं नाही. त्यांनी केलेलं विधान हे तर्कहीन आहे," असं उत्तर बाळासाहेब थोरात यांनी दिलं.   


साताऱ्यात शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्यात थेट लढत 


दरम्यान, उदयनराजे हे साताऱ्यातून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. उदयनराजे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. तर दुसरीकडे या जागेसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. त्यामुळे येथे उदयनराजे भोसले आणि शशिकांत पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. विजयी कामगिरी करण्यासाठी या दोन्ही नेत्यांकडून जोमात प्रचार चालू आहे. त्यामुळे या जागेवर नेमकंक काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


हेही वाचा :


पगार तब्बल 24 कोटी! कोण आहेत निखील मेसवानी जे मुकेश अंबानींचे आहेत खास!


गणेश चतुर्थीला दिल्लीत कोणाच्या घरी बैठक झाली होती? शिवसेनेला एकटं पाडण्याचा प्लॅन, धनजंय मुंडेंनी शरद पवारांना घेरलं


सोलापूर आणि माढ्यात आमच्यावर गाढवाला देव म्हणण्याची वेळ आली होती, धैर्यशील मोहितेंचा रणजित निंबाळकरांवर हल्लाबोल