Dhairyasheel Mohite Patil, Pandharpur : " पाच वर्षापूर्वी निवडणुकीच्या धामधूमीच्या आधी इथं जत्रा भरली होती. एकाने तंबू लावला होता. तो म्हणत होता, एका रुपयात देव पाहा. जशी आता इथं गर्दी जमली तशीच गर्दी तिथे जमले होती. तंबूवाला रुपया घ्यायचा आणि आत जाणाऱ्याला सांगायचा की, आत जर तुला दोन गाढवं दिसले आणि तू बाहेर जाऊन सांगितलं की मला गाढव दिसले. तर पुढील जन्मी तू गाढव होणार आहे. अशीच परिस्थिती माढा आणि सोलापूर लोकसभेची झाली होती. आमच्यावर गाढवाला देव म्हणण्याची वेळ आली होती. तू चूक आम्ही करुन बसलो", असे माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) म्हणाले. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माढा लोकसभेचे उमेदवार  धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) , शेकाप नेते अनिकेत देशमुख, रघुनाथराजे देशमुख, सक्षणा सलगर आदी नेते उपस्थित होते. 


उजनी धरणात पाणी असूनही पाण्याच्या प्रश्न निर्माण होतोय


अभिजीत पाटील म्हणाले, आपण पुढील पाच वर्षात काय करणार आहोत, हे बोलणे आवश्यक आहे. उजनी धरणात पाणी असूनही पाण्याच्या प्रश्न निर्माण होतोय. आपल्याला बंधारे बांधण्याची गरज आहे. खासदारांनी पुढील काळात हे प्रश्न सोडण्याची गरज आहे. दुष्काळी परिस्थितीत कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात घाण पाणी येत आहे. 3000 टीडीएसचे पाणी आपल्याकडे येत आहे. अशुद्ध पाण्याने कॅन्सर आणि किडनी स्टोनचे प्रमाण वाढत आहे, असंही पाटील यांनी सांगितले. 


सबस्टेशन निर्माण करण्याची गरज आहे


पुढे बोलताना अभिजीत पाटील म्हणाले, आपल्या जिल्ह्यात लाईटची वाईट परिस्थिती आहे. सबस्टेशन निर्माण करण्याची गरज आहे. सहा तासात 10 वेळा लाईट ट्रीप होती. आज आपल्याला नदीला 3 पाळ्या सोडल्या. पंढरपूर तालुक्यात मोठा तरुण वर्ग आहे. इंजिनिअर झालेली मुलं पुणे-मुंबईत जातात. त्यामुळे येथील तरुणांना रोजगाराची गरज आहे. माझ्या शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने पाणी गेले पाहिजे, यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे. पवार साहेबांच्या विचारांचा जिल्हा करायचा आहे, असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Lok Sabha Election 2024 : नाशिक, दिंडोरीतून पहिल्याच दिवशी तीन नामनिर्देशनपत्र दाखल; गोडसे, शिंदेंसह 'इतक्या' उमेदवारांनी घेतले अर्ज