एक्स्प्लोर

Maval Loksabha: ठाकरे गटाचा मावळ लोकसभेचा उमेदवार ठरला? अनंत गीतेंनी गुपित फोडलं, म्हणाले...

Maharashtra Politics: अनंत गीते यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाने मावळ लोकसभा मतदारसंघातून खरोखरच संजोग वाघेरे यांचे नाव निश्चित केले आहे का, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप बाकी आहे.

पनवेल: महाविकास आघाडीत लोकसभा जागावाटपाबाबत अद्याप एकमत झाले नसताना ठाकरे गटाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी मावळमधील (Maval Loksabha) उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पनवेलमध्ये सभा झाली. यावेळी अनंत गीते (Anant Gite) यांनी आपल्या भाषणात मावळ लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या नावाचा उल्लेख केला. अनंत गीते यांनी म्हटले की, जशी मला रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे, तशीच संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात सहा मेळावे झाले आहेत. आज खोपोली, पनवेल, उरणमध्ये मेळावे संपन्न होतील. मी उद्धव ठाकरे यांना शब्द दिला आहे की, मी रायगडचा खासदार होईनच. पण सोबतच संजोग वाघेरे हेदेखील मावळचे खासदार होतील. अनंत गीते यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाने मावळ लोकसभा मतदारसंघातून खरोखरच संजोग वाघेरे यांचे नाव निश्चित केले आहे का, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. संजोग वाघेरे हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहिले आहेत. काही महिन्यांपूर्वीच वाघेरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि ठाकरे गटात प्रवेश केला होता.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघाची लढत प्रतिष्ठेची ठरली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना पराभवाची धूळ चारली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांची उमेदवारी अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. श्रीरंग बारणे अपयशी खासदार ठरलेले आहेत. त्यांचा मतदारांशी जनसंपर्क राहिलेला नाही. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी, अशी मागणी सुनील शेळके यांनी अजित पवारांकडे केली होती. अशातच आता ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी मिळाल्यास भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासमोर कोणाला रिंगणात उतरवणार, हे पाहावे लागेल.

मावळमध्ये मविआचा खासदार होईल, हे खात्रीने सांगतो: संजोग वाघेरे

या सभेत संजोग वाघेरे यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, मावळ मतदारसंघाची संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली.  त्याप्रमाणे मी मावळ, पिंपरी चिंचवड, कर्जत खालापूर मधील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. या भागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या मतदारसंघात पिण्याच्या पाण्याची वानवा आहे. रुग्णालय चांगले नाही. आधीच्या लोकांनी कोणते ठोस काम केले, हे सांगता येत नाही. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या संबंधी समस्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये महाविकास आघाडीचा खासदार निवडून येईल, याची खात्री मी देतो, असे संजोग वाघेरे यांनी सांगितले.

आणखी वाचा

मावळ लोकसभेत कमळाचा खासदार होणार, भाजपने शड्डू ठोकले; श्रीरंग बारणे नव्हे बाळा भेगडेंना उमेदवारी देण्याची मागणी

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Sanjay Raut: नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Embed widget