Rahul Gandhi Marriage: रायबरेली लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघाचे  काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची एक संयुक्त सभा पार पडली. या सभेच्या समारोपावेळी सभेतील एका मुलानं राहुल गांधींना लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला यावेळी प्रियांका गांधी मंचावर उपस्थित होत्या. त्यांनीच राहुल गांधींना त्या मुलाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सांगितलं. राहुल गांधी यांनी कार्यकर्त्याच्या प्रश्नाचा सन्मान ठेवत उत्तर दिलं.  


राहुल गांधी कधी लग्न करणार?


सभेत राहुल गांधी यांना एका लहान मुलानं लग्नासंदर्भात प्रश्न विचारला. यावर राहुल गांधी म्हणाले आता वाटतंय लवकरच करावं लागेल. राहुल गांधी यांच्या उत्तरावेळी प्रियांका गांधी हे सर्व पाहत होत्या. प्रियांका गांधी यांनी रायबरेलीत आज काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात केली. यावेळी त्या रायबरेलीत घरोघरी जाऊन प्रचार सुरु करणार आहेत.  


पाहा व्हिडीओ :






रायबरेली सोनिया गांधी आणि इंदिरा गांधींची कर्मभूमी  


राहुल गांधी यांनी महारजगंज येथील एका सभेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी म्हटलं की यावेळी रायबरेलीतून निवडणूक लढवण्यासाठी आलोय. काही दिवसांपूर्वी आईसोबत बसलो होते. एका व्हिडीओत माझी पहिली आई सोनिया गांधी आणि दुसरी आई इंदिरा गांधी आहेत, असं सोनिया गांधींना सांगितल्याचं राहुल गांधी म्हणाले. ही माझ्या दोन्ही आईंची कर्मभूमी आहे. यासाठी इथून निवडणूक लढवण्यासाठी आलोय, असं राहुल गांधी म्हणाले.  


राहुल गांधी यावेळी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत नसून त्यांनी केरळच्या वायनाडमधून देखील निवडणूक लढवली आहे. रायबरेलीत त्यांची लढत भाजपच्या दिनेश प्रतापसिंह यांच्याशी होणार आहे. यापूर्वी सोनिया गांधी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत.  


दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते. त्यावेळी देखील त्यांनी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. वायनाडमधून ते विजयी झाले होते. आता यावेळी देखील ते दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवतील अशा चर्चा होती. मात्र, त्यांनी रायबरेलीला प्राधान्य दिलं.


संबंधित बातम्या : 


नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा


आणखी एका राजकीय भूकंपाची शक्यता, लोकसभेच्या रणधुमाळीत अजून एक पक्ष फुटण्याच्या मार्गावर, बंडखोर आमदार पार्टीवर दावा सांगणार