चंदीगड : देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु आहे. आज चौथ्या टप्प्यात 96 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडतंय. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना हरियाणात (Haryana Politics) मोठ्या घडामोडी घडत आहे. भाजप सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) यांच्या हातून पक्ष निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप सरकारचा पाठिंबा तीन अपक्ष आमदारांनी काढून घेतल्यानंतर  दुष्यंत चौटाला यांनी राज्यपालांकडून बहुमत चाचणीची मागणी केली आहे. मात्र, याचवेळी  दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी (JJP Party Crisis) फुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. पक्षाचे बहुसंख्य आमदार बंड करण्याची शक्यता असून दुष्यंत चौटाला यांची पार्टी फुटण्याच्या मार्गावर आहे. जेजेपीचे बंडखोर नेते देवेंदर बबली यांनी मोठी घोषणा केली आहे. 


देवेंदर बबली यांनी बंडखोरी केली असून त्यांनी दुष्यंत चौटाला यांना जेजेपीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदावरुन हटवणार असल्याचं त्यांनी म्हटलं. दुष्यंत चौटाला यांनी स्वत:हून विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केलीय. अन्यथा आम्ही त्यांना हटवू, असं बबली यांनी म्हटलंय. 


10 पैकी 8 आमदार विरोधात जाणार


देवेंदर बबली यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना म्हटलं की दुष्यंत चौटाला यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय पण त्यांना पत्र लिहिण्याचा अधिकार नाही. जेजेपीचे 10 पैकी 8 आमदार त्यांच्या विरोधात आहेत. दुष्यंत चौटाला यांच्याजवळ त्यांची आई नैना चौटाला यांचा पाठिंबा असल्याचं देवेंदर बबली म्हणाला. 


देवेंद्र बबली यांनी आमच्याकडे 8 आमदार असून आम्ही विधिमंडळ पक्षावर दावा सांगणार असल्याचं म्हटलंय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुष्यंत चौटाला यांनी भाजपला पाठिंबा दिला. साडे चार वर्ष भाजपसोबत सरकार चालवलं. काही महत्त्वाची खाती स्वत: जवळ ठेवली आहेत. आता भाजपचं सरकार पाडा असं ते म्हणतात. दुष्यंत चौटालांची विचारधारा बदलली आहे आता ते काँग्रेसला पाठिंबा देत आहेत. पहिल्यांदा ते काँग्रेसला सर्वात मोठ शत्रू म्हटलं होतं,असा दावा देवेंदर बबली यांनी केला. 


जेजेपीच्या बंडखोर आमदारांनी पक्षावर दावा सांगण्याची तयारी पूर्ण केलीय. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये ते पक्षावर दावा सांगू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची जेजेपीच्या बंडखोर नेत्यांसोबत बैठक झाली होती.


संबंधित बातम्या :  


Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान


Lok Sabha Election Voting Maharashtra : राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात नंदुरबारची आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी