![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मोठी बातमी! माढा मतदारसंघावर जयंत पाटलांचा दावा, आघाडीत नवा पेच; रासापसाठी जागा सोडणाऱ्या शरद पवार गटाची गोची होणार?
Madha Lok Sabha Constituency : माढासह हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापाला मिळावेत असा डाव भाई जयंत पाटील यांच्याकडून टाकला जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
![मोठी बातमी! माढा मतदारसंघावर जयंत पाटलांचा दावा, आघाडीत नवा पेच; रासापसाठी जागा सोडणाऱ्या शरद पवार गटाची गोची होणार? Lok Sabha Election 2024 Jayant Patil claim on Madha Lok Sabha Constituency Sharad Pawar problem increase marathi news मोठी बातमी! माढा मतदारसंघावर जयंत पाटलांचा दावा, आघाडीत नवा पेच; रासापसाठी जागा सोडणाऱ्या शरद पवार गटाची गोची होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/12/14495b8c886f2539427d6ffeff2bd8401710222244231737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Madha Lok Sabha Constituency : माढा लोकसभा मतदारसंघावर आता शेकापने दावा केल्याने महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) पेच वाढण्याची शक्यता आहे. यासाठी सांगोला येथे शेकापने भव्य मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले आहे. सांगोला तालुक्यासह माढा तालुक्यात शेकापची मोठी ताकद आहे. त्यामुळे माढासह हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापाला मिळावेत असा डाव भाई जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडून टाकला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांनी (Sharad Pawar) रासपचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना सोडण्याची तयारी दाखवली असतानाच, जयंत पाटलांच्या दाव्याने नवीन तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
सोमवारी सांगोलामध्ये आमदार जयंत पाटील, शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह कार्यकत्यांनी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात आमदार पाटील यानी इंडिया आघाडीमधून माढा आणि हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापला मिळावे यासाठी आग्रही मागणी केली. या मागणीमुळे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, रासपचे महादेव जानकर यांच्यानंतर आता नव्या पक्षाने दावा सांगितल्याने माढयाचा तिढा आणखी वाढणार आहे.
धनगर समाज आपलासा करायची शरद पवारांची व्यूहरचना....
आमदार जयंत पाटील यांच्या दाव्यामुळे रासापसाठी मतदारसंघ सोडायची तयारी दर्शविणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गोची होणार आहे. महादेव जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन धनगर समाज आपलासा करायची व्यूहरचना शरद पवारांची असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महादेव जानकर यांना माढा सोडण्याची ऑफर दिली होती. याचा फायदा सुप्रिया सुळे यांच्या बारामतीसह इतर मतदारसंघात होऊ शकणार होता. मात्र आता भाई जयंत पाटील यांनी माढा मतदारसंघावर दावा केल्याने आघाडीसमोरील अडचणी वाढणार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच....
माढा लोकसभा मतदारसंघ अधिकच चर्चेत आला आहे. कारण आधी महायुती आणि आता महाविकास आघाडीत या जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षात माढा लोकसभा मतदारसंघासाठी पक्षांतर्गत स्पर्धा असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील या जागेवर दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील आता याच मतदारसंघावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. शरद पवारांनी हा मतदारसंघ महादेव जानकर यांना सोडण्याची तयारी दर्शवली असतानाच, महाविकास इंडीया आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी देखील या जागेवर दावा केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)