एक्स्प्लोर

Krishnaraaj Mahadik On Ravindra Chavan: अमित ठाकरेंविरोधात आंदोलन, रवींद्र चव्हाणांनी कान टोचले; आता कृष्णराज महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Krishnaraaj Mahadik On Ravindra Chavan: भाजपच्या युवा मोर्चाच्या आंदोलनावरुन रवींद्र चव्हाण यांनी कान टोचले होते. आता यावर कृष्णराज महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Krishnaraaj Mahadik On Ravindra Chavan: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पुण्यातील सरकारी कॉलेजच्या कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा फोटो हटवल्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसेमध्ये सुरू असलेला वाद विकोपाला गेला. मुंबईतील माहीममध्ये भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तुफान राडा झाला. या आंदोलनावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे कान टोचले. 

रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र युवा मोर्चाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी (Ravindra Chavan On Krishnaraaj Mahadik) व्यक्त केली आहे. काल आलेला पोरगा (अमित ठाकरे) काही तरी बोलतो आणि आपण त्याविरोधात आंदोलन करतो हे चुकीचे आहे, असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटले. मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर व्यासपीठावरून चव्हाणांनी युवा मोर्चाला सुनावले. तुम्ही आणि मी सर्वजण पाहता, ते कालचं पोरगं कायतरी बोलतं, कोणतरी ते ऐकतं आणि कोणतरी  जाऊन ती तसबिरी काढतं, याविरोधात आपण आंदोलन करायला नव्हते पाहिजे. माझी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, नका आंदोलनं करु. हे काय करतायत, हे लक्षात घ्या. हे चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. मीच तो कार्यकर्ता आहे, मीच तो पदाधिकारी आहे. मला युवाशक्तीला कुठेही अडचणीत आणायचं नाही. आम्हाला युवकांना शिक्षित करायचे आहे, गुंड म्हणून तयार करायचे नाही, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले. रवींद्र चव्हाण यांच्या या विधानावर आता कृष्णराज महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

कृष्णराज महाडिक रवींद्र चव्हाणांच्या विधानावर काय म्हणाले? (Krishnaraaj Mahadik On Ravindra Chavan)

रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. रवींद्र चव्हाण जो आदेश देतील, तो आम्ही पाळतो. आम्हाला व्यक्त व्हावसं वाटलं तसं आम्ही वागलो, असं कृष्णराज महाडिक म्हणाले. तसेच अशा प्रकारची आंदोलनं जेव्हा होतील, तेव्हा गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते तयार होणार नाहीत, याबद्दल मी आमच्या वरिष्ठांना आश्वस्त करतो. आमची भूमिका ही नेहमी राष्ट्रहितासाठी आम्ही घेतो, असं कृष्णराज महाडिकांनी सांगितले. 

नेमकं प्रकरण काय, दादरमध्ये काय घडलं? (MNS BJP Rada Dadar Mahim Mumbai)

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पुण्यातील सरकारी कॉलेजच्या कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसेमध्ये सुरू असलेला वाद विकोपाला गेला. काल 1 सप्टेंबरला मुंबईतील माहीममध्ये भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तुफान राडा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो अमित ठाकरे यांनी हटवल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने माहीममध्ये आंदोलनाची घोषणा केली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ आणि मनसेच्या कार्यालयाबाहेर महाराष्ट्र सैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बराच वेळ भाजपाचे आंदोलक शिवतीर्थ परिसरात न आल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजयुमोच्या आंदोलनस्थळाकडे धडक दिली, त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धरपकड करून आंदोलन पांगवण्याचा प्रयत्न केला. गजानन काळेंसह मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

कृष्णराज महाडिक काय काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Sanjay Raut On Krishnaraaj Mahadik: कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
Delhi CJP Protest : दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; कथित 'हिंदू रक्षा दला'शी संबंधित चौघांना अटक
दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; कथित 'हिंदू रक्षा दला'शी संबंधित चौघांना अटक
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Advertisement

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Embed widget