Sanjay Raut On Krishnaraaj Mahadik: कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
Sanjay Raut On Krishnaraaj Mahadik: मुंबईतील दादरमध्ये काल मनसे आणि भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा पाहायला मिळाला.

Sanjay Raut On Krishnaraaj Mahadik: मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी अमित ठाकरे पुण्यातील महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेले होते. तिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ नरेंद्र मोदींचा फोटो लावलेला होता. अमित ठाकरे यांनी त्या फोटोबाबत आक्षेप घेतल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी तो फोटो हटवला. याविरोधात भाजप युवा मोर्चाकडून (BJP Yuva Morcha) मुंबईतील मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन करण्याची मोहीम आखली होती. मात्र भाजपच्या या आंदोलनाआधीच मनसेचे नेते देखील शिवतीर्थाबाहेर पोहोचले. त्यामुळे कृष्णराज महाडिक (Krishnaraaj Mahadik) आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांचे घर तर सोडाच पण शिवाजी पार्कची वेसही ओलांडता आली नाही. यानंतर मनसे आणि भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा पाहयला मिळाला.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. आम्ही शांतपणे आंदोलन करत होतो. त्यावेळी आमच्यावर मनसेचे गुंड आक्रमक झाले. आमच्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मनसेचे गुंड आमच्या अंगावर धावून आले. माझ्यावर सुद्धा काही मुलं धावून आली. या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असं कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत काय म्हणाले? (Sanjay Raut On Krishnaraaj Mahadik)
बाळा, तू चुकीच्या पक्षात आहेस. ही मुंबई आहे. ती आजही शिवसेना, अस्सल मराठी माणूस आणि ठाकरेंचीच आहे. बाकी सगळे येतात आणि जातात, असं संजय राऊत कृष्णराज मडाडिकांना म्हणाले.
बाळा,
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 2, 2026
तू चुकीच्या पक्षात आहेस!
ही मुंबई आहे,
ती आजही शिवसेना,अस्सल मराठी माणूस आणि ठाकऱ्यांचीच आहे!
बाकी सगळे येतात आणि जातात!@KDMahadik https://t.co/rNkG4RRd90
नेमकं प्रकरण काय, दादरमध्ये काय घडलं? (MNS BJP Rada Dadar Mahim Mumbai)
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पुण्यातील सरकारी कॉलेजच्या कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसेमध्ये सुरू असलेला वाद विकोपाला गेला. मुंबईतील माहीममध्ये भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तुफान राडा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो अमित ठाकरे यांनी हटवल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने माहीममध्ये आंदोलनाची घोषणा केली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ आणि मनसेच्या कार्यालयाबाहेर महाराष्ट्र सैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बराच वेळ भाजपाचे आंदोलक शिवतीर्थ परिसरात न आल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजयुमोच्या आंदोलनस्थळाकडे धडक दिली, त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धरपकड करून आंदोलन पांगवण्याचा प्रयत्न केला. गजानन काळेंसह मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
माहिममध्ये मनसे आणि भाजयुमोचे कार्यकर्ते आमनेसामने, VIDEO:
संबंधित बातमी:
Before You Go
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप





















