एक्स्प्लोर

Jitendra Awhad and Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी कानात काहीतरी सांगितलं अन् ऋषिकेश टकले आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर तुटून पडला; आव्हाडांनी 'तो' व्हिडीओ दाखवला

Jitendra Awhad and Gopichand Padalkar clash: गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांचा तुफान राडा. हा राडा सुरु असताना गोपीचंद पडळकर जवळच उभे होते, हे समोर आले आहे.

Jitendra Awhad and Gopichand Padalkar clash: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासणारा प्रकार घडला. गुरुवारी संध्याकाळी विधिमंडळाच्या आवारात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख (Nitin Deshmukh) याला मारहाण केली. विधानभवनातील सुरक्षारक्षकांनी या कार्यकर्त्यांना रोखल्याने पुढचा अनर्थ टळला. मात्र, या सगळ्या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, 'मला काही माहिती नाही', 'मी आत्ताच इथे आलो', असे सांगून या घटनेपासून नामनिराळे राहण्याचा प्रयत्न करणारे गोपीचंद पडळकर ही घटना घडली तेव्हा तिकडेच होते, हे समोर आले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये गोपीचंद पडळकर हे विधिमंडळाच्या लॉबीच्या काचेच्या गेटबाहेर आपल्या कार्यकर्त्यांच्या कानात काहीतरी सांगताना दिसत आहेत. गोपीचंद पडळकर यांचा हा 'कानमंत्र' मिळाल्यानंतर ऋषिकेश टकले आणि त्यांचे कार्यकर्ते काचेच्या गेटमधून आतमध्ये गेले आणि थेट विधिमंडळाच्या लॉबीत उभ्या असलेल्या नितीन देशमुख याच्यावर हल्ला चढवला का, असा सवाल आता निर्माण झाला आहे. हे सगळेजण नितीन देशमुख लॉबीतून बाहेर येताना पाय़ऱ्यांवर उभे होते, असे व्हिडीओत दिसत आहे. नितीन देशमुख गेटमधून बाहेर पडताना त्याचा पडळकर यांच्याशी शाब्दिक वाद झाल्याचे सांगितले जाते. पडळकरही नितीन देशमुख याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे जात होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना मागे सारले आणि ते पुढे गेले आणि कार्यकर्त्यांनी नितीन देशमुखला मारायला सुरुवात केली. या झटापटीत गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आणि नितीन देशमुख परत विधिमंडळाच्या लॉबीत आत ढकलले गेले. तेव्हा गोपीचंद पडळकर हे काचेच्या बाहेरून आत काय चालले हे बघत असल्याचे या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. मात्र, या राड्यानंतर प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारताच गोपीचंद पडळकरांनी हसतहसत 'मला काय झाले ते माहितीच नाही', असे सांगितले. 

या सगळ्या प्रकारानंतर गोपीचंद पडळकर हे भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना जाऊन भेटले होते. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. याचं अतीव दुःख मला आहे, सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त  करतो, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

विधानभवन लॉबीतच हाणामारी, व्हिडिओ व्हायरल, विरोधकांचा संताप; गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Video: आव्हाड-पडळकर समोरासमोर भिडले; तुझ्या गांxx दम किती बघतो, विधानभवनाबाहेरच नेत्यांचा राडा

महत्त्वाच्या बातम्या

ठाण्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला खिंडार, युवक अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
ठाण्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला खिंडार, युवक अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget