एक्स्प्लोर

विधानभवन लॉबीतच हाणामारी, व्हिडिओ व्हायरल, विरोधकांचा संताप; गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात कालच गाडीचा दरवाजा उघडण्यावरुन वाद झाला होता.

मुंबई : मी काय तुला घाबरतो का, असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध चक्क विधानभवन परिसरातील लॉबीमध्ये भिडल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, पडळकर समर्थकांकडून जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता असल्याच्या नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर, दोन्ही बाजूने शिवीगाळ झाल्याचं पाहायला मिळाल, यावेळी येथील सुरक्षा रक्षकांनी पुढे येत ही भांडणे सोडवली. मात्र, तोपर्यंत घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि काही क्षणातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर, विरोधकांकडून घटनेचा तीव्र संताप व्यक्त होत असून मला मारण्याचा प्रयत्न झाल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. आता, या घटनेवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात कालच गाडीचा दरवाजा उघडण्यावरुन वाद झाला होता. यावेळी, दोघांमध्ये शिवीगाळ झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तर, गेल्याच आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा परिसरातच अरे मंगळसुत्र चोराचा.. अशी घोषणाबाजी केल्याने दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरू होते. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या या राड्याचे पडसाद आज चक्क विधानभवन लॉबी, परिसरात पाहायला मिळाले. त्यावरुन, येथील आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला असून थेट विधानसभा अध्यक्षांकडेही याबाबत मागणी करण्यात आली आहे. विरोधकांनी देखील या घटनेवरुन गृहमंत्री तथा मुख्यमंत्र्‍यांकडे कारवाईची मागणी केली आहे. आता, स्वत: मुख्यमंत्र्‍यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

विधिमंडळ परिसरात झालेल्या राड्यानंतर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येत प्रतिक्रिया दिली. घडलेली घटना योग्य नाही,  मारामारी करणं, विधानभवनात करणं योग्य नाही. विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींच्या अंतर्गत हा परिसर येतो, त्यांनी घटनेची दखल घ्यावी. अध्यक्षांनी कडक कारवाई करावी, अशी विनंती मी केली आहे. हे विधानसभेला शोभणारं नाही, त्यामुळे कारवाई झालीच पाहिजे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी घडलेल्या प्रकारावर आपली भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरेंची मागणी, गुंडांच्या पोशिंद्यावरती कारवाई करा

विधानसभा परिसरातील राड्यावर बोलताना, गुंडांच्या पोशिंदांवरती आणि गुंडांवरती कारवाई केली पाहिजे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. विधानभवन हे पवित्र मंदिर आहे, तिथे अशाप्रकारे मारामारी होत असेल तर हे चुकीचं आहे. लोकप्रतिनिधींना धक्काबुक्की होत असेल, मारहाण होत असेल तर हे चुकीचं आहे. विधानभवन प्रांगणामध्ये एवढा कडेकोट बंदोबस्त असताना हे लोक आतमध्ये कसे आले? यांना पास कुणी दिले? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला. 

हेही वाचा

फडणवीसांकडून काल ऑफर, उद्धव ठाकरेंनी आज अँटी चेंबरमध्ये घेतली भेट; दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Embed widget