कोल्हापूर:  महाराष्ट्रात सध्या निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. तिकीट मिळणे, अर्ज भरणे, प्रचार  करणे अशा सगळ्या धामधुमीत उमेदवारांची निवड आणि तिकिटांचं वाटपालाही जोर आलाय.  अनेक नेते, कार्यकर्त्यांनी तिकिटासाठी जोरदार लॉबिंगही केल्याचं दिसतंय. अशात आता  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar)  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant Patil) शिंदे गटाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची (Rajendra Patil Yadravkar)  भेट घेतली आहे. तसेच हातकणंगलेत (Hatkanangale) महाविकास आघाडीच्या उमेदवाराला (Maha Vikas Aghadi) मदत  करण्याचं आवाहन केले आहे.  यड्रावकर आणि जयंत पाटलांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे.  (Jayant Patil Meets Rajendra Patil Yadravkar)


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट  घेतली. यड्रावकर यांच्या जयसिंगपूरमधील घरी दोघांची भेट झाली . या भेटी वेळी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील हे उपस्थित होते.  जयंत पाटील यांच्याकडून हातकणंगलेचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना मदतीसाठी आमदार यड्रावकरांना साकडं घातलं . शिंदे गटांसोबत असलेल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची जयंत पाटील यांनी भेट घेतल्यामुळे  अनेकांच्या भुवया उंचवल्या आहे.  धैर्यशील माने यांच्यावरील नाराजीमुळे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांचे नाव देखील हातकणंगले लोकसभेसाठी  चर्चेत होतं.


निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटील यांची भेट, चर्चांना उधाण


राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष आमदार म्हणून निवडुन आले आहेत.  त्यानंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. मोहिते राजेंद्र पाटील यड्रावकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते मात्र 2019 साली उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत ते निवडुन आले.मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मैत्रीचे संबध हे त्याचे आधीपासूनचे आहेत आणि म्हणून काही महिन्यांपूर्वी राजेंद्र टोपे यांनी देखील राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली होती. आता जयंत पाटील यांनी भेट घेतली. मात्र निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटील यांची भेट ही खूप काही सांगून जाते.  




राजेंद्र पाटील यड्रावकर नाराज?


राजेंद्र पाटील यड्रावकर हे नाराज होते. कारण ते अपक्ष आमदार आहेत.मात्र ज्या अपक्ष आमदारांनी महयुतीला पाठिंबा दिला त्या आमदारांना महायुतीच्या चर्चांमध्ये सहभागी केले जात नाही, यावरुन त्यांची नाराजी होती. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ही नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील बोलून दाखवली होती. त्यामुळेच आजा जयंत पाटील यांनी भेट घेतल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. 


हे ही वाचा :


Jayant Patil on Hatkanangle Lok Sabha : हातकणंगलेसाठी जयंत पाटलांनी इस्लामपुरात कार्यकर्त्यांना भरला दम; म्हणाले, असला धंदा बंद करा..!