Jalna news: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांसह राजकीय वर्तुळात आणि आंदोलक मनोज जरांगे( Manoj Jarange) यांची दररोज टोलवाटोलवी होत असताना, मराठा समाजासाठी आरक्षण मिळवणे आणि पाडापाडी करणे हेच उद्दिष्ट असल्याचे सांगत मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह दरेकर व प्रकाश आंबेडकरांवरही निशाणा साधलाय.


मराठा आरक्षण प्रश्न स्थगित केलेल्या उपोषणानंतर मनोज जरांगे यांनी शरद पवारांच्या बैठकीवर टीका करत लाईव्ह बैठक घेण्यापेक्षा डोंगरावर जाऊन मोठ्याने बोला आणि लाइव्ह करा. यांच्या कुठेही भेटी होतात मात्र आरक्षणासाठी बोलत नाहीत. आणि म्हणतात आम्ही लाईव्ह करायचं. असं मनोज जरांगे म्हणालेत. समाजात गोंधळ निर्माण करून गैरसमज पसरवण्याच्या षडयंत्र असल्याचे सांगत त्यांनी दरेकरांवरही निशाणा साधलाय. 


तुम्ही आरक्षण देणार नसाल तर पाडापाडी करावीच लागेल


सध्या मराठा समाजासाठी आरक्षण मिळवणे आणि पाडापाडी करणे हेच उद्दिष्ट असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. मराठा समूह समाजाला घुमवाघुवी करत आहेत. या दोघांनी मिळून आरक्षण द्यायला हवे. मनात असेल तर काही करता येतं. शरद पवारांनी लाईफ बैठक घेण्यापेक्षा डोंगरावर जाऊन मोठ्याने बोलून लाइव्ह करावे. यांच्या कुठेही भेटी होतात मात्र आरक्षणासाठी ते बोलत नाहीत. सत्तर वर्षांपासून सगळे वेड्यात काढत आहेत, असं म्हणत मनोज जरांगे यांनी शरद पवारांवर टीका केली. 


दरेकरांवर हल्लाबोल


मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा दरेकरांवर हल्लाबोल केलाय. फुकटात निवडून येणारे मिस गाईड करतात मागील दारातून गैरसमज निर्माण करतात असं म्हणत मराठ्यांच्या लाटेत हे होरपळून जाणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. नेत्याला खुश करावे लागते अन्यथा दुसऱ्या वेळी सत्ता मिळत नाही. असे म्हणत त्यांनी प्रवीण दरेकरांना टोलावले.


समाजाने नेत्यांच्या हमाल्या करायच्या का?


राजकीय लोकांचे डाव असून मराठा मोठे झालेले यांना जमत नाही. समाजाला काही माहिती किंवा राजकीय नेते आणि समाजाला माहिती हवी असेल तर सर्व लाईव्ह आहे. सत्ताधारी आणि विरोधक गैरसमज पसरवणारे आहेत. समाजाने नेत्यांच्या हमाल्या करायचा का ?असा सवाल करत  सत्ताधाऱ्यांवर मनोज जरंगे यांनी संताप व्यक्त केला.


हेही वाचा: 


Prakash Ambedkar In Kolhapur : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध, विधानसभेला ओबीसीकडे मोर्चा वळवला; प्रकाश आंबडेकर काय काय म्हणाले?


मराठा-ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात, बीड जालन्यात जाऊन तळ ठोकणार, माझा महाकट्टावर भूमिका मांडली!