Sharad Pawar and Maratha Protest : मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलक पवारांच्या भेटीसाठी रामा हॉटेलला पोहचले आहेत. पवारांनी भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आलाय. दरम्यान, आंदोलक आक्रमक झाल्याने रामा हॉटेलला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 


शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर मराठा आंदोलक काय म्हणाले? 


मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांशी आमची किमान अर्धा-पाऊणतास चर्चा झाली. चर्चेमध्ये शरद पवारांनी सांगितलं मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. आमच्यामध्ये बैठक झाली. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना असं कळवलं की, सर्व पक्षीय नेते, ओबीसी नेते, आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना एकत्रित बोलवा. आपण याच्यावर तोगडा काढू. ती चर्चा लाईव्ह राहिलं. महाराष्ट्रात जो कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे, त्याच्यावर आपण तोडगा काढायला हवा. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तर आम्ही तयार आहोत, असं शरद पवारांनी आम्हाला बैठकीत सांगितल्याचे मराठा आंदोलक म्हणाले. 


सरकारने जरांगे पाटलांशी काय चर्चा केली?  हाकेंशी काय चर्चा केली? याबाबतची स्पष्टता कोणालाच नाहीये


पुढे बोलताना आंदोलक म्हणाले, शरद पवारांनी सांगितलं की, सरकारने जरांगे पाटलांशी काय चर्चा केली?  हाकेंशी काय चर्चा केली? याबाबतची स्पष्टता कोणालाच नाहीये. त्यामुळे शरद पवारांचं मतं आहे की, सर्वांना एकत्रित बसवा. मग ओबीसी नेते असतील जरांगे पाटील असतील. शिवाय विरोधक किंवा सत्ताधारी देखील सर्वांना एकत्रित बसून चर्चा केली पाहिजे. लाईव्ह चर्चा व्हायला पाहिजे. त्या चर्चेतून पुढे काय होईल त्याबाबत आपण ठरवू, असंही शरद पवारांकडून सांगण्यात आल्याचं मराठा आंदोलकांनी म्हटलंय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar on Amit Shah : दंगली प्रकरणी सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री, शरद पवारांचा अमित शाहांवर हल्लाबोल