Jalna News: माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल असे म्हणत निलेश साहेबांनी नितेश साहेबांना समजून सांगावं. मी आणखी राणे साहेबांना उत्तर दिलं नाही. त्यांनी त्यांच्या अंगावर घेऊ नये ही विनंती आहे असं मनोज जरांगे (Manoj jarange) म्हणाले आहेत. अंतरवली सराटीमधून उपोषण मागे घेतल्यानंतर निलेश राणेंच्या (Nilesh Rane) x माध्यमावरच्या पोस्टला मनोज जरांगे यांनी उत्तर दिलंय.


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanavis) जोरदार टीका करत असल्याचं दिसत असताना त्यांनी राणेंच्या सोशल मिडीया पोस्टवर फार न बोलण्यालाच पसंती दिल्याचं दिसतंय.


…..त्यामुळे फडणवीस रोषांचे धनी होताय


माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल, निलेश साहेबानी नितेश साहेबाना समजून सांगावे असं म्हणत बाकीच्यांना फडणवीस साहेबानी अभियान राबवायला सांगितलंय. ते राबवताय आम्ही विश्वास टाकलाय. ठरलेलं द्या, पण हे बिलिंदर लोकमध्ये टाकताय. मला ट्रॅप केले जातंय, सत्ता फडणवीस साहेब चालवताय. यामुळे भाजप वाटोळं होतंय, फडणवीस रोषाचे धनी होताय असं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधलाय.


राणेसाहेबांनी त्यांच्या अंगावर घेऊ नये..


मी आणखी राणे साहेबांना उत्तर दिलं नाही. त्यांनी त्यांच्या अंगावर घेऊ नये ही विनंती असल्याचे सांगत निलेश राणेंच्या पोस्टवर फार बोलण्याचे टाळले. माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल, निलेश साहेबानी नितेश साहेबाना समजून सांगावे असे म्हणत त्यांनी फडणवीसांकडे टीकेचा मोर्चा वळवल्याचे पहायला मिळाले.


काय म्हणाले निलेश राणे?


दुसऱ्यांना संपवायची भाषा करणारा स्वतःच जास्त काळ टिकत नाही जरांगे पाटील, एक-दोन तालुक्यांमध्ये स्वतःचे समर्थक असले म्हणजे राज्याचा नेता किंवा समाजाचा नेता होता येत नाही.


काही मराठा समाजाच्या तरुणांना माझी विनंती आहे या माणसाबरोबर राहण्यात आता काही अर्थ नाही, आपल्या भविष्याचा विचार करा. किती वेळा हा माणूस आंदोलन स्थगित करणार आणि पुन्हा सुरू करणार आणि पुन्हा तुम्हाला जमिनीवर बसवणार??


मुख्मंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या बैठकीवरही प्रतिक्रिया


आपल्या बाजून बोलणारा, लेखी देणारा मग तो कोणत्याही पक्षाचा असो आम्ही त्याला निवडूण आणणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीवर देखील जरांगे पाटील बोलले. मला वाटत नाही आरक्षणावर शरद पवार काही बोलले असतील. कारण, बोलले असते तर त्यांनी काही ना काही सांगितलं असतं असेही जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, समाजाशी चर्चा करुन पुढील निर्णय घेणार आहे. येत्या 29 जुलै रोजी मी सगळी भुमिका जाहीर करणार असल्याचे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले.


हेही वाचा:


Nilesh Rane : या माणसासोबत राहण्यात अर्थ नाही, याचे एक-दोन तालुक्यामध्ये समर्थक; निलेश राणेंची मनोज जरांगेंवर टीका


निवडणुकीत टार्गेट कोण असणार? कोणाला निवडून आणणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं