Manoj Jarange Patil : समाजाशी चर्चा करुन पुढची भूमिका 29 ऑगस्टला जाहीर करणार असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले. सरकारनं माझ्या विरोधात अभियान राबवलं आहे. मला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु असल्याचे जरांगे म्हणाले. आपल्या बाजून बोलणारा, लेखी देणारा, मग तो कोणत्याही पक्षाचा असो आम्ही त्याला निवडून आणणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. तर काही ठिकाणी आमची देखील तयारी करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 


जे लोक मागच्या दारानं आमदार झालेत ते माझ्या विरोधात टीका करत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मात्र, मी आता कोणावरही टीका करणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. सलाईन लावून उपोषण करने काही कामाचे नाही. सलाईन काढून उपोषण केलं पाहिजे असे जरांगे म्हणाले. मंत्री शंभूराज देसाई यांनी दोन महिन्यांचा वेळ मागितला होता. आणखी त्यांना 13 ऑगस्टपर्यंत वेळ असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मी कामाला लागलो आहे. विरोधकही आमचे होत नाहीत, सत्ताधारी देखील आमचे होत नाहीत, मग आमच्यापुढे पर्याय काय? असेही जरांगे पाटील म्हणाले. 


राणे साहेबांवर अद्याप मी काहीही बोललो नाही


राणे साहेबांवर अद्याप मी काहीही बोललो नाही. त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेऊ नये. निलेश राणे साहेबांनी नितेश राणे साहेबांना सांगावं असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. नाहीतर मग मला नाविलाजास्तव बोलावं लागेल असे जरांगे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी तीन चार जणांना माझ्या विरोधात अभियान राबवायला सांगितलं असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 


मुख्मंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या बैठकीवरही प्रतिक्रिया


आपल्या बाजून बोलणारा, लेखी देणारा मग तो कोणत्याही पक्षाचा असो आम्ही त्याला निवडूण आणणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीवर देखील जरांगे पाटील बोलले. मला वाटत नाही आरक्षणावर शरद पवार काही बोलले असतील. कारण, बोलले असते तर त्यांनी काही ना काही सांगितलं असतं असेही जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, समाजाशी चर्चा करुन पुढील निर्णय घेणार आहे. येत्या 29 जुलै रोजी मी सगळी भुमिका जाहीर करणार असल्याचे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


''जरांगेंनी शरद पवारांना जाब विचारावा, केवळ फडणवीसांमुळेच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला''; विखे पाटलांनी सांगितला इतिहास