एक्स्प्लोर

भारत जगातील सर्वात शक्तिशाली देश, 2047 पर्यंत बनणार विश्वगुरू: राजनाथ सिंह

Rajnath Singh: भारत आता कमकुवत राहिलेला नसून तो जगातील एक शक्तिशाली देश बनला आहे. जो 2047 पर्यंत विश्वगुरू बनेल, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मंगळवारी म्हणाले आहेत.

Rajnath Singh: भारत आता कमकुवत राहिलेला नसून तो जगातील एक शक्तिशाली देश बनला आहे. जो 2047 पर्यंत विश्वगुरू बनेल, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह  (Defence Minister Rajnath Singh) मंगळवारी म्हणाले आहेत. भारताने आजपर्यंत जगातील कोणत्याही देशावर कधीही हल्ला केलेला नाही, मात्र जर कोणी भारताकडे वाईट नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला तर भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे, असेही संरक्षण मंत्री म्हणाले.

केंद्रातील विद्यमान सरकार भारताचा सन्मान आणि स्वाभिमान कोणत्याही किंमतीवर कमी होऊ देणार नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले. आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजस्थानच्या उदयपूर शहरात पन्नाधय यांच्या पुतळ्याच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, 'आम्हालाही संकल्प घ्यायचं असून भारताला एक मजबूत आणि शक्तिशाली देश बनवायचा आहे. भारताचे संरक्षण मंत्री या नात्याने मला असे म्हणायचे आहे की, भारत आता कमकुवत भारत राहिलेला नाही, भारत आता जगातील एक शक्तिशाली देश बनला आहे.

'आपल्या पंतप्रधानांनी पाच मिनिटांत घेतला निर्णय'

जम्मू-काश्मीरमधील उरी आणि पुलवामा (Uri And Pulwama Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा संदर्भ देत राजनाथ सिंह म्हणाले, 'मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला भारताच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. पाकिस्तानचे दोन दहशतवादी आले आणि त्यांनी आमच्या पॅरा मिलिटरी फोर्सेसच्या जवानांवर हल्ला केल्याचे तुम्ही पाहिले. उरी आणि पुलवामाच्या घटनांशी आपण सर्व परिचित आहात. जेव्हा मी त्या घटनेबद्दल चर्चा करतो तेव्हा मला आठवते की त्या दिवशी माझ्या पॅरा मिलिटरी फोर्सेसच्या शहीद जवानांचे मृतदेह खांद्यावर घेतल्यावर मला कसे वाटत होते.' ते म्हणाले, 'त्यानंतर तुम्ही पाहिले की आपल्या पंतप्रधानांनी आपल्या तीन मंत्र्यांपैकी दोघांना बोलावून पाच मिनिटांत निर्णय घेतला आणि आपले लष्कराचे जवान भारताच्या नव्हे तर पाकिस्तानच्या भूमीत जाऊन दहशतवाद्यांचा संपूर्ण खात्मा करण्यात यशस्वी झाले.

'भारत 2047 पर्यंत विश्वगुरू बनेल'

ते म्हणाले, 'भारत केवळ पंतप्रधानांमुळेच जागतिक नेता म्हणून उदयास आला आहे. आपल्या पंतप्रधानांची प्रतिमाही जागतिक नेत्याची झाली आहे. हे सत्यही आपण स्वीकारले पाहिजे. मला असे म्हणायचे आहे की भारताला विश्वगुरू होण्यासाठी फक्त 25 वर्षे लागतील. 2047 पर्यंत भारत विश्वगुरू बनलेला असेल.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
Beed Crime: माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
Embed widget