एक्स्प्लोर

Jyoti Waghmare On Sanjay Raut: हिंमत असेल तर दुबईत जाऊन पीच उखडून दाखवा; ज्योती वाघमारे कडाडल्या, ठाकरेंना काय काय म्हणाल्या?

Jyoti Waghmare On Sanjay Raut: ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणाऱ्या लोकांसोबत तुम्ही जाऊन बसताय. ऑपरेशन सिंदूरच्या पुड्या तुम्ही बांधताय, अशी टीकाही ज्योती वाघमारे यांनी केली.

Jyoti Waghmare On Sanjay Raut: आशिया कपमध्ये (Asia Cup 2025) आज दुबईत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात हायव्होलटेज क्रिकेट सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार आज रात्री 8 वाजता सामना  सुरू होईल. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अलीकडेच बिघडले आहेत. त्यामुळे भारतातून अनेकांनी पाकिस्तानविरुद्धचा भारताचा सामना रद्द करावा, पाकिस्तानविरुद्ध भारताने खेळू नये, अशी मागणी होत आहे.  याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी-शाहांची ही राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. संजय राऊतांच्या या टीकेवर आता शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

बेशरमपणा, निर्दयपणा काय असतो हे संजय राऊत यांची प्रेस बघा. आज संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये शिव्या दिल्या. कोणत्याही सुसंस्कृत मराठी माणसाला मानवणार नाही. एक काळ असा होता, सकाळी उठले की, लोक देवाची नावे घ्यायची. आजची सकाळ भांडुपच्या भामट्याने उजळत आहे... हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत ज्योती वाघमारे यांनी निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितलं होतं, कुत्ते सिर्फ भोगते है, असली शिवसैनिक ठोकते है...असंच बोलत असतील तर महाराष्ट्राचा शिवसैनिक त्यांना ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा देखील ज्योती वाघमारे यांनी दिला. 

तुम्ही तिथे जाऊन पीच उखडून दाखवा- ज्योती वाघमारे

उद्धव ठाकरेंना पहलगामवर बोलायचा अधिकार नाही. पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा सर्व पक्ष बैठक बोलावली होती. उबाठाचे सगळे खासदार गैरहजर होते. पहलगाम हल्ला झाला, त्यावेळेस त्या ठिकाणी पोहचणारे महाराष्ट्राचे पहिले नेते एकनाथ शिंदे होते. संजय राऊत यांनी आपली बोलबच्चनगिरी बंद करावी. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तुम्ही राहुल गांधी यांची भाषा बोलताय. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणाऱ्या लोकांसोबत तुम्ही जाऊन बसताय. ऑपरेशन सिंदूरच्या पुड्या तुम्ही बांधताय, अशी टीकाही ज्योती वाघमारे यांनी केली. बाळासाहेब ठाकरे हे जिवंत असताना भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान मैदान उकडण्याचं काम केलं होतं. ते नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे संजय राऊतजी तुम्हाला एवढेच वाटत असेल तर ज्या ठिकाणी मॅच होत आहे, तिथे जाऊन तुम्ही मैदान उखडा...कंगना रणौतला ट्विट करून जा म्हणण्यापेक्षा, तुम्ही तिथे जाऊन पीच (खेळपट्टी) उखडून दाखवा, असं आव्हान देखील ज्योती वाघमारे यांनी दिलं आहे. 

संबंधित बातमी:

Sanjay Raut on India-Pakistan Asia Cup Match : पाकिस्तानविरुद्ध खेळणाऱ्या भारताच्या खेळाडूंना लाज वाटली पाहिजे, शुभम द्विवेदींच्या पत्नीचा आक्रोश ऐका; संजय राऊत कडाडले!

Ind vs Pak Asia Cup 2025: टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येही पाकिस्तानविरुद्ध बहिष्काराचे वारे; गौतम गंभीरची खेळाडूंसोबत चर्चा, भारत-पाक सामना रद्द होणार?

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget