एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : भविष्यात महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाही अशी अवस्था करु: बावनकुळे

जेवढी ताकद आम्ही भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी लावू, त्यापेक्षा दहापट जास्त ताकत शिंदे गटाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी लावू असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Nagpur News : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंजाची, मशाल आणि घड्याळाची काळजी करावी, ढाल तलवार सोबत आम्ही आहोत. या महाविकास आघाडी सरकारला भविष्यात उमेदवार सुद्धा मिळणार नाही, अशी अवस्था आम्ही यांची करू, अशा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत आता आमची युती आहे. त्यामुळे जेवढी ताकद आम्ही आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी लावू त्यापेक्षा दहा पट जास्त ताकत शिंदे गटाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी लावू, आम्ही पूर्णपणे शिंदे गटाच्या पाठीशी उभे आहोत, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नेतृत्वातल्या शिवसेनेसोबत युती करून पंचायत समितीपासून लोकसभेपर्यंत सर्व ठिकाणी युतीत निवडणूक लढवू. 45 लोकसभेच्या आणि 200 विधानसभेच्या जागा जिंकू. शिंदे गटाच्या आमदारांना मिळाळेल्या सुरक्षेवर बोलताना ते म्हणाले. शिंदे गटाचे आमदारांना मिळालेली सुरक्षा प्रशासनिक समितीच्या अहवालानुसार मिळाली असेल. राज्यातील कुठल्या व्यक्तीच्या जीविताला धोका असेल, तर त्यालाही अशाच पद्धतीने सुरक्षा पुरवली जाऊ शकते. आमदाराला मिळालेल सुरक्षा प्रशासनिक निर्णय असावा असेही यावेळी ते म्हणाले.

आपले प्रदेशाध्यक्षपद वाचविण्यासाठी पटोलेंकडून 'ही' कृती

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोदी नावाची कॅसेट वाजवतात. राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) नजरेत येण्यासाठी आपले प्रदेशाध्यक्ष पद वाचवण्यासाठी ते असे करतात. प्रत्येक माणसाने आपली क्षमता किंवा औकात ओळखली पाहिजे. मोदींसमोर नाना पटोलेची काय क्षमता आहे. मागील 2 महिन्यात नाना पटोले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत आम्ही नाना पटोले यांना पराभूत करू, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

आधीचे सरकार झोपा काढणारे

एकनाथ शिंदे हे या आधीच्या सरकारला लाथ मारून आले होते. अन्यायाच्या विरोधात त्यांनी आवाज उचलला होता म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. का आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार नाही? आज 18-18 तास काम करणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे. आधीचे 18 तास झोपणारे सरकार चांगले की, आत्ताचे सरकार चांगले, हे जनतेला विचारा असेही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

श्वानाने रस्त्यावर घाण केल्यास मालकावर कारवाई, सार्वजनिक ठिकाण अस्वच्छ करणाऱ्यांवर 84 हजारांचा दंड

तो हनुमंताच्या दर्शनाला आला अन् गदाच घेऊन गेला

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : स्वर्गीय अजित दादांनी माझे जिवलग मित्र इंद्रनील नाईकांना मंत्री केलं, दोघंही मंत्री झालो असतो तर...; भर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत
स्वर्गीय अजितदादांनी माझे जिवलग मित्र इंद्रनील नाईकांना मंत्री केलं, दोघंही मंत्री झालो असतो तर...; भर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, पुढची निवडणूक ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, जयकुमार गोरेंचा खोचक टोला
पालकमंत्री असो वा नसो मी नाशिकमध्ये हजर, पालकमंत्र्यांची कमी भासू देणार नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य, म्हणाले, सहा महिन्यात सगळी कामे पूर्ण होतील
पालकमंत्री असो वा नसो मी नाशिकमध्ये हजर, पालकमंत्र्यांची कमी भासू देणार नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य, म्हणाले, सहा महिन्यात सगळी कामे पूर्ण होतील
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
Embed widget