एक्स्प्लोर

Ravindra Waikar: शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकरांचं खळबळजनक भाष्य, नियतीने ही वेळ कोणावरही आणू नये

Maharashtra Politics: रवींद्र वायकर हे शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी घरातून निघाले होते तेव्हा ते प्रचंड भावूक झाले होते. उद्धव ठाकरे यांच्याविषयी वायकरांच्या मनात अजूनही सॉफ्ट कॉर्नर असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

मुंबई: मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर माझ्यासमोर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरले होते. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. नियतीने अशी वेळ कोणावरही आणू नये, असे वक्तव्य शिंदे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी केले. रवींद्र वायकर यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांचे हे वक्तव्य पाहता रवींद्र वायकर हे शरीराने शिंदे गटात आले असले तरी मनाने ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच असल्याच्या चर्चा होत्या. वायकर यांच्या वक्तव्याने त्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे शिंदे गटानेही वायकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे रवींद्र वायकर लोकसभेची निवडणूक किती इर्ष्येने लढतील, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

रवींद्र वायकर यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मला चुकीच्या प्रकरणात गोवल्यानंतर माझ्याकडे गजाआज जाणे किंवा पक्ष बदलणे, हे दोनच पर्याय उरले होते.  दबाव तर होताच, परंतु पत्नीचेही नाव गोवले गेल्यावर माझ्यापुढे पर्याय नव्हता. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. माझ्यावर नियतीने जी वेळ आणली, ती कोणावरही येऊ नये, असे सांगत रवींद्र वायकर यांनी मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली.

माझ्या हातातील शिवबंधन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेपासून आहे व खांद्यावरचे शिवधनुष्यही. बाळासाहेबांच्या शिवसेनेत 50 वर्षे राहिल्यानंतर मला उद्धव ठाकरे यांची साथ सोडावी लागली, तेव्हा एखाद्या कुटुंबसदस्याला आपण पारखे होतो, तशीच माझी भावना होती. परंतु नियतीने माझ्यासमोर यक्षप्रश्न निर्माण करून ठेवला व नियतीच कसा बदल घडवून आणू शकते, ते सर्वांनीच पाहिले आहे, वायकर यांनी म्हटले.

रवींद्र वायकरांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे काय बोलणार?

रवींद्र वायकर यांनी स्पष्टपणे दबाव असल्यामुळेच आपण शिंदे गटात प्रवेश केल्याची कबुली दिली आहे. यामुळे आता एकनाथ शिंदे यांची गोची होऊ शकते. लोकसभेची उमेदवारी दिलेला नेता आपल्याला दबावाखाली शिंदे गटात  प्रवेश करावा लागला, असे म्हणत असेल तर विरोधकांच्या दाव्याला आणखीनच बळ मिळू शकते. ईडी आणि सीबीआयचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी भाग पाडले जात आहे, असा आरोप वारंवार विरोधक करतात. आता मुंबईतील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र वायकर यांच्या वक्तव्याचे भांडवल करुन विरोधक भाजप आणि शिंदे गटाविरोधात वातावरणनिर्मिती करु शकतात.

आणखी वाचा

जीवाभावाच्या सहकाऱ्यांची साथ सोडण्यापूर्वी रवींद्र वायकर गणपतीच्या दर्शनाला, उद्धव ठाकरेंचा विषय निघताच डोळे पाणावले

पत्नीचा रडवेला चेहरा, स्वत:ची हताश देहबोली; रवींद्र वायकरांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेश सोहळ्याची राजकीय वर्तुळात चर्चा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार घोषित
Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार घोषित
Vidhan Parishad Election 2026: विजय वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्याला सुरंग; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषदेत अरुण लखानींचा बिनविरोध विजय; भाजपचा मास्टर प्लॅन यशस्वी, वाचा इनसाईड स्टोरी
विजय वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्याला सुरंग; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषदेत अरुण लखानींचा बिनविरोध विजय; भाजपचा मास्टर प्लॅन यशस्वी, वाचा इनसाईड स्टोरी
Nashik Vidhan Parishad Election 2026: 'जाहीर पाठिंबा देण्याचा विषयच येत नाही, निवडणूक खूप पुढे गेलीय'; महाजन-सामंत नाशिकमध्ये असतानाच गोकुळ गीतेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
'जाहीर पाठिंबा देण्याचा विषयच येत नाही, निवडणूक खूप पुढे गेलीय'; महाजन-सामंत नाशिकमध्ये असतानाच गोकुळ गीतेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026: दोन तारखा...दोन प्रवास...आणि विलक्षण योगायोग; बिनविरोध विजयी होताच अनिकेत तटकरेंची पोस्ट, काय म्हणाले?
दोन तारखा...दोन प्रवास...आणि विलक्षण योगायोग; बिनविरोध विजयी होताच अनिकेत तटकरेंची पोस्ट, काय म्हणाले?

व्हिडीओ

Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bal Mane : विनायक राऊत डोमकावळा, कोकणात शिवसेनेची वाट लावली, शिंदेंचे भाट म्हणून काम करतात, बाळ मानेंचा हल्लाबोल
विनायक राऊतांनी कोकणात शिंदेसेनेची सुपारी घेतली, ते शिंदेसेनेचे भाट, बाळ मानेंचा राणेंच्या घरासमोरुन पलटवार
Gold Silver Rate : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, शेअर बाजारात तेजी, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण
गुड न्यूज, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Captain Bharat Bhardwaj Viral Video : दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
Repo Rate RBI MPC Meeting: रेपो रेट कायम राहणार की वाढणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा घोषणा करणार, Home Loan महागणार की स्वस्त होणार?  
 रेपो रेट कायम राहणार की वाढणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा घोषणा करणार, गृहकर्जदारांचं लक्ष लागलं
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Aamir Khan Confirm His Wedding With Gauri Spratt: 'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Embed widget