एक्स्प्लोर

Harshwardhan Vasantrao Sapkal : साध्यासुध्या चेहऱ्याला सिंहासनावर बसवलं, हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमून काँग्रेसचा मोठा मास्टरस्ट्रोक, भाजप चेकमेट!

Harshwardhan Vasantrao Sapkal : भाजपचं सर्वांत मोठं हत्यार निष्प्रभ, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करून काँग्रेसने कोणता मास्टरस्ट्रोक खेळला?

Harshwardhan Vasantrao Sapkal : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा पराभव स्विकारावा लागलाय. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल झालेत. नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. हायकमांडने देखील नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर केला असून नव्या प्रदेशाध्यक्षाची नेमणूक केलीये. विशेष म्हणजे काँग्रेसने कोणत्या साखर सम्राट, शिक्षण सम्राटाला किंवा प्रस्थापित नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची संधी न देता तळागाळातून पुढे आलेल्या हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांना संधी दिलीये. त्यामुळे भाजपने  काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांना हँडल करण्यासाठी सातत्याने वापरलेलं हत्यार आता निष्प्रभ होणार आहे. कारण काँग्रेसने आता साध्यासुध्या चेहऱ्याला सिंहासनावर बसवलंय. 

विशेष म्हणजे काँग्रेस समोर आमदार अमित देशमुख, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमित देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या सारखे अनेक पर्याय होते. मात्र, काँग्रेसने सर्व प्रस्थापित नेते बाजूला करुन हर्षवर्धन सपकाळ यांना संधी दिलीये. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने महाराष्ट्रात मोठे बदल केले आहेत. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपद मिळालेलं असलं तरी हर्षवर्धन सपकाळ यांच्यापुढे मोठी आव्हानं असणार आहेत. महायुतीकडे विधानसभेत मोठं संख्याबळ आहे. शिवाय पक्षांतर्गत राजकारणाला देखील त्यांना सामोरं जाव लागू शकतं. 

प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ काय काय म्हणाले?

कुठलाही राजकीय वारसा नसलेला एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली... या संधीचं मी सोनं करेल...संकटाच्या काळात मला जरी संधी मिळाली तरी एक कर्मठ योद्धा म्हणून मी लढणार अशी प्रतिक्रिया नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले, हर्षवर्धन सपकाळ संघटनेतील  व्यक्ती आहे.. सेवाभावी विचाराची व्यक्ती आहे... समर्पित माणूस आहे....  पूर्णवेळ काम करणारा नेता आहे. आम्ही दोघे मिळून जोमात काम करू... पक्षाच्या कार्यकर्त्यांना पूर्णवेळ काम देणे... पूर्ण ताकद आम्ही देऊ.. 

अमित देशमुख म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी उत्तम संघटन कौशल्य असलेले, माजी आमदार मा. श्री. हर्षवर्धन जी सपकाळ आपली निवड झाली आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा.. राज्यातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सामाजिक एकोपा जोपासत विकास प्रक्रिया राबवण्याचे काँग्रेस पक्षाचे धोरण, राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या  कारकिर्दीत घडेल आणि यातून महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला पूर्व वैभव प्राप्त होईल, पक्ष नेतृत्वाने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरेल हा विश्वास वाटतो आहे.

माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले, उत्तम संघटन कौशल्य आणि काँग्रेस पक्षावरील अढळ निष्ठा या सर्वांच्या जोरावर माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ! जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा आपला प्रवास कौतुकास्पद आहे. सामान्य कार्यकर्त्याला संधी, त्यांच्या कष्टाला आणि निष्ठेचा योग्य सन्मान हा काँग्रेस पक्षच करू शकतो हे पुन्हा सिद्ध झाले आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना आपण केलेल्या विविध विकासकामांमुळे जनसामान्यांचे जीवन अधिक सुरळीत झाले. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रात्रंदिवस आपण झटलात. ‘आदिवासी जिवनोत्थान’सारख्या उपक्रमाद्वारे शेवटच्या घटकासाठी लढण्याची भूमिका, कार्यकर्त्यांशी जोडले जाण्याची आणि जनतेशी संवाद साधण्याची तळमळ पक्षासाठी महत्वपुर्ण ठरली. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राच्या राजकारणात नवी दिशा देण्यासाठी आपण सगळे मिळून कार्यरत राहू. आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जिल्हा परिषद सदस्य ते प्रदेशाध्यक्ष, तळागाळातून आलेल्या नेत्याकडे महाराष्ट्र काँग्रेसची धुरा, हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला  
अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला
Satish Bhosale: सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
Nashik Godavari : एकीकडे गोदामाईचा श्वास गुदमरतोय अन् दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब दावा; म्हणाले, गोदावरी प्रदूषित नाहीच!
एकीकडे गोदामाईचा श्वास गुदमरतोय अन् दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब दावा; म्हणाले, गोदावरी प्रदूषित नाहीच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Bhosale Arrested: Suresh Dhasयांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटकPankaja Munde On Suresh Dhas : पक्षश्रेष्ठींनी आमदार धस यांना समज द्यावी : पंकजा मुंडेAjit Pawar Tribute Yashwantrao Chavan : अजित पवारांची प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाणांना आदरांजलीAjit Pawar PC Pritisangam : सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा याची शिकवणी चव्हाण साहेबांनी दिली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला  
अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला
Satish Bhosale: सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
Nashik Godavari : एकीकडे गोदामाईचा श्वास गुदमरतोय अन् दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब दावा; म्हणाले, गोदावरी प्रदूषित नाहीच!
एकीकडे गोदामाईचा श्वास गुदमरतोय अन् दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब दावा; म्हणाले, गोदावरी प्रदूषित नाहीच!
कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 आमदार महायुतीचे असूनही अर्थसंकल्पात भोपळा, पण साखरसम्राटांच्या कारखान्यांसाठी 'पेटारा' उघडला!
कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 आमदार महायुतीचे असूनही अर्थसंकल्पात भोपळा, पण साखरसम्राटांच्या कारखान्यांसाठी 'पेटारा' उघडला!
जीवाचा प्रश्न म्हणत भाजप आमदाराची बनावट पनीर घेत थेट विधीमंडळात एन्ट्री, 'लक्षवेधी'तून ठेवणार अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर बोट
जीवाचा प्रश्न म्हणत भाजप आमदाराची बनावट पनीर घेत थेट विधीमंडळात एन्ट्री, 'लक्षवेधी'तून ठेवणार अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर बोट
Ajit Pawar : महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडने उज्ज्वल निकमांसमोर वकीलांची फौज उभी केली, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय!
वाल्मिक कराडने उज्ज्वल निकमांसमोर वकीलांची फौज उभी केली, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय!
Embed widget