एक्स्प्लोर

Sanjay Raut: मनसेला सोबत घेण्याबाबत हर्षवर्धन सपकाळांनी व्यक्त केली होती नाराजी; संजय राऊतांनी थेट काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची चर्चा

Sanjay Raut: हेहर्षवर्धन सपकाळांनी मनसेबाबत घेतलेल्या भूमिकेवरून तक्रार केल्याची चर्चा आहे. राऊतांनी केलेल्या तक्रारीवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

मुंबई: ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची (Harshwardhan Sapkal) काँग्रेस हायकमांडकडे (Congress high command) तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळांनी (Harshwardhan Sapkal) मांडलेल्या भूमिकेवरून ही तक्रार केल्याचं कळतंय. मात्र संजय राऊतांनी केलेल्या तक्रारीवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. संजय राऊतांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची (Harshwardhan Sapkal) तक्रार काँग्रेस हायकमांडकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे. हर्षवर्धन सपकाळांनी मनसेबाबत घेतलेल्या भूमिकेवरून तक्रार केल्याची चर्चा आहे. राऊतांनी केलेल्या तक्रारीवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

Harshwardhan Sapkal : मला दिल्लीला बोलवण्यात आले म्हणून मी तिकडे गेलो

दरम्यान निवडणूक आयोगाला भेटायला गेलेल्या शिष्टमंडळामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव होतं, मात्र ते अनुपस्थित राहिल्याने चर्चा सुरू झाल्या होत्या, त्याबाबतच्या प्रश्नावर सपकाळांनी उत्तर दिलं आहे. मनसेला सोबत घेण्यासंदर्भात हे शिष्टमंडळ नव्हतं. हे शिष्टमंडळ निवडणुकांमधील घोटाळ्यासंदर्भात भेटलं होतं. यामध्ये आघाडी-युतीच्या चर्चा होण्याचा प्रश्न नाही. काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आमचे लोक त्यात सहभागी झाले मला दिल्लीला बोलवण्यात आले म्हणून मी तिकडे गेलो, अशी माहिती सपकाळांनी दिली आहे. 

Harshwardhan Sapkal : कोणाला आघाडीत घ्यायचं नाही यावर दिल्लीत निर्णय होईल

निवडणूक आयोगाकडे रास्त प्रश्न विचारले. ⁠१३ तारखेला रमेश चेन्नीथल यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भुमिका स्पष्ट केली होती. पक्षश्रेष्ठींकडून काहीही बोलले नाहीत. मी पक्षाच्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. राहूल गांधी यांनी याआधी ही निवडणूक आयोगाच्या संदर्भात बोलले आहेत. कोणाला आघाडीत घ्यायचं नाही यावर दिल्लीत निर्णय होईल. संजय राऊत इंडिया आघाडीचे नेते आहेत त्यांच्या सोबत बोलायला मला काहीही अडचण नाही. दिवाळीच्या शुभेच्छा ही मी त्यांना देईन, असंही सपकाळ म्हणालेत.

Sanjay Raut: नेमकं प्रकरण काय?

संजय राऊत यांनी काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना लिहिलेल्या पत्रात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधातील तक्रार नोंदवली आहे. मनसेला 'महाविकास आघाडी'मध्ये समाविष्ट करण्यास सपकाळ यांचा तीव्र विरोध आहे, जो त्यांनी राऊत यांना देखील स्पष्ट केला होता. मात्र, हर्षवर्धन सपकाळ यांनी राऊत यांना पत्राद्वारे सांगितले होते की, “राज ठाकरे यांच्याबाबत चर्चा करून नंतर कळवतो,” असे असतानाही राऊत यांनी थेट दिल्लीतील काँग्रेस दरबारी पत्र पाठवून तक्रार केली. या कृतीमुळे काँग्रेस वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget