एक्स्प्लोर

Gopichand Padalkar: आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते, आव्हाडांच्या कार्यकर्त्यासोबत हाणामारी कशी झाली? गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

Gopichand Padalkar & Jitendra Awhad Clash: जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी रात्री विधिमंडळाच्या लॉबीत हाणामारी झाली होती.

Gopichand Padalkar on Vidhan Bhavan Rada: विधानभवनाच्या आवारात गुरुवारी संध्याकाळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या समर्थकांमध्ये हाणमारी झाली होती. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले होते. यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विधानभवनात नेमके काय घडले, हे सविस्तरपणे सांगितले.

काल मी या सगळ्या प्रकारावर भूमिका व्यक्त केली होती. मी माननीय अध्यक्ष महोदयांकडे दिलगिरी व्यक्त केली. मी अध्यक्षांना विनंती केली होती की, आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली. त्यांना सक्त ताकदी देऊन जी काय कारवाई करायची ती करा, असे मी त्यांना सांगितले. हा विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारितील विषय आहे. रात्री उशीरा याप्रकरणात एफआयआर दाखल झाला. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे सर्वोच्च असतात. त्यांच्या भूमिकेवर आमचं कुठलंही मत नाही, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. 

आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत. जी कारवाई झाली आहे, त्याला कोर्टात आम्ही सामोरे जाऊ. तुम्ही सगळे व्हिडीओ बघा. मी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कोपऱ्यात माझ्या कार्यकर्त्यांसोबत उभा होतो. तेव्हा नितीन देशमुख आमच्याजवळ आला, त्याची आणि माझी कोणतीही ओळख नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत फोटो काढत होतो. माझी लक्षवेधी असल्यामुळे मी दिवसभर सभागृहात होतो. रात्री सभागृहात मंत्री नसल्यामुळे माझी लक्षवेधी रद्द करण्यात आली, त्यामुळे मी सभागृहाबाहेर आलो. आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आहे, आम्ही त्या निर्णयाचा आदर करतो. आम्ही याविरोधात न्यायालयात लढाई देऊ, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. यावर पत्रकारांनी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना अडवले का नाही, असा प्रश्न पडळकरांना विचारला. त्यावर पडळकर यांनी काही न बोलता, 'नंतर या सगळ्या विषयावर बोलू', असे सांगत काढता पाय घेतला.

गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गुरुवारी मध्यरात्री पोलिसांची गाडी अडवून ठेवण्याच्या ठिय्या आंदोलनावरही भाष्य केले. पोलिसांच्या गाडीसमोर झोपणे किंवा अडवणे ही गुंडगिरी नाही का, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा

सराईत गुन्हेगार, खुनी हल्ला, मारामारी, विनयभंग अन् बरंच काही; बेलगाम गोपीचंद पडळकरांच्या त्या गावगुंड कार्यकर्त्याची 'कट्टर' ओळख

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget