एक्स्प्लोर
Advertisement
पुन्हा मैदानात उतरु, तेव्हा सदाभाऊ आणि मी सरकारची पळता भुई थोडी करु, बैलगाडी शर्यत मुद्द्यावरुंन गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
'जेव्हा मी आणि सदाभाऊ खोत बैलगाडी शर्यतीच्या विषयात मैदानात उतरु, तेव्हा सरकारची पळता भुई थोडी करु', असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.
सांगली : ''जेव्हा मी आणि सदाभाऊ खोत बैलगाडी शर्यतीच्या विषयात मैदानात उतरु, तेव्हा सरकारची पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा सरकारने पोलीस बळाचा वापर करण्याचे उद्योग करु नयेत.'' अशा आक्रमक शब्दात बैलगाडी शर्यतीच्या विषयावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
पशुसंवर्धन मंत्र्यांनी 24 ऑगस्ट रोजी एक महिन्याच्या आत बैलगाडी शर्यत सुरू करतो अशी घोषणा केली होती. आता डिसेंबर महिना उजाडला आहे, ही बैठक फक्त राजकारणासाठी घेतली होती का? असा सवालही पडळकर यांनी उपस्थित केला आहे. तसंच सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करताना पडळकर म्हणाले, ''झरे गावामध्ये 20 ऑगस्टला आम्ही बैलगाडी शर्यती आयोजित केल्या होत्या, आम्ही शर्यती घेतल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आणि 24 ऑगस्टला मंत्रालयात अनेक मंत्री आणि अनेक बैलगाडी चालक-मालक संघटनच्या उपस्थितीत बैठक झाली. तेव्हा पशु संवर्धन मंत्र्यांनी 24 ऑगस्ट रोजी एक महिन्याच्या आत बैलगाडी शर्यत सुरू करतो अशी घोषणा केली होती. पण अजून यावर काहीही निर्णय होत नाही.''
'शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणं गरजेचं'
बैलगाडी शर्यती सुरू करण्याच्या मागणीच्या बाबतीत महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांची भावना समजून घेणे गरजेचे आहे. 2012 पासून बैलगाडी शर्यती बंद झाल्या, गोवंश जपला पाहिजे गोवंशाचे संवर्धन झालं पाहिजे, खिलार गाईंची जातही नष्ट व्हायला लागली आहेत आणि बैलांची संख्या जवळजवळ 50 ते 60 टक्के घटली आहे. बैलगाडी शर्यतीच्या विषयामध्ये सरकारने ताबडतोब लक्ष घालावे. जर आम्ही या विषयात पुन्हा हात घालून मैदानात उतरलो, तर आम्ही राजकारण करतोय, लोकांना भडकावण्याचं काम करतोय अशी टीका होईल. असंही पडळकर म्हणाले.
हे ही वाचा :
- OBC Reservation : राज्य सरकारकडून ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम, चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल
- PHOTO : दुर्गराज रायगडला राष्ट्रपतींची भेट; 'भवानी तलवार' आणि 'शिवराई होन'ची प्रतिकृती भेट
- Raigad Viral Video : दुर्गराज रायगड आणि शिवछत्रपतींचा मोहक पुतळा....रायगडवरच्या मुसळधार पावसाचा 'हा' व्हिडीओ होतोय व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement