एक्स्प्लोर

Girish Mahajan On Angry Women: इथून चालते व्हा, तुमचं काय चाललंय...काल महिला संतापली; आज गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Girish Mahajan On Angry Women: मुंबई काल एक महिला मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर प्रचंड चिडली होती. आता घटनेवर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Girish Mahajan On Angry Women: लोकसभेत महिला आरक्षण (Women Reservation Bill) घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर काल मुंबईत भाजपकडून विरोधी पक्षांविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वरळीच्या जांबोरी मैदान ते एनएससीआय डोमपर्यंत हा भाजपचा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र या जनआक्रोश मोर्चामुळं जांबोरी मैदान परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळं संतप्त झालेल्या महिलेच्या रागाचा सामना मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना करावा लागला. सदर महिलेनं गिरीश महाजनांवर प्रश्नांचा भडिमार केला. या दरम्यानचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Mumbai Women Angry Girish Mahajan)

सदर महिलेने गिरीश महाजनांसमोर संताप व्यक्त केला. तुमचं हे काय चाललंय?, इथून चालते व्हा...शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. विरोध करायचाच तर तो मैदानात करा, वाहतूक कोंडी का करत आहात?, असा सवालही महिलने उपस्थित केला. संतापलेल्या महिलेने उपस्थित असणाऱ्या पोलिसांना देखील सवाल केला. इतकी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असताना तुम्ही बघ्याची भूमिका का घेत आहात?, असा प्रश्न महिलेने पोलिसांना विचारला.

सदर घटनेनंतर गिरीश महाजन काय म्हणाले? (Girish Mahajan On Angry Women)

मुंबईत काल घडलेल्या घटनेनंतर आज माध्यमांशी गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला. यावर वाहतूक कोडींमुळे त्या महिला वैतागलेल्या होत्या. मोर्च्यामुळे थोड्या फार प्रमाणात वाहतूक कोंडी आणि सामान्यांना गैरसोय होत असते. मात्र त्यावेळी एक भगिनी महिला तिथे अत्यंत वाट्टेल तशा भाषेत बोलत होत्या. त्या महिला पोलीस भगिनींसोबतही अत्यंत वाईट भाषेत बोलत होत्या. मी त्यांना समजावत होतो की आम्ही 10-15 मिनिटांत निघून जाऊ, असं गिरीश महाजन यांनी सांगितले. त्या महिलेने बाटली फेकून मारली, ज्या भाषेचा वापर केला ते चुकीचं होतं, असं गिरीश महाजन म्हणाले. तसेच पुढच्या वेळी यासंदर्भात आम्ही काळजी घेऊ की कुणाला अशी गैरसोय होणार नाही, असंही गिरीश महाजनांनी सांगितले. 

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

संबंधित बातमी:

Mumbai Women Angry Girish Mahajan Video: पोलिसांना नडली, गिरीश महाजनांना तोंडावर म्हणाली, इथून चालते व्हा...; महिला का चिडली, नेमकं काय घडलेलं?, VIDEO

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget