गोंदियाः विदर्भात (Gondia) नेत्यांची भाऊगर्दी आहे. मात्र व्हिजन ठेवून काम करणारे मोजकेच नेते आहे. त्यात नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे अग्रक्रमावर आहे. अशी स्तुती सुमने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी नितीन गडकरींवर उधळली. गोंदिया येथे दोन राष्ट्रीय महामार्गांच्या डिजाटल भूमीपूजन सोहळ्यात ते बोलत होते.


नितीन गडकरी आणि मी फक्त निवडणूकीपुरतेच विरोधक असून निवडणुका संपल्या की आम्ही चांगले मित्र आहोत. मी आजवर नितीन गडकरींना सांगितलेली कोणतीही कामे कधीच अपूर्ण राहिले नाही. विकासाचे व्हिजन ठेवून काम करणारे नेते म्हणजेच गडकरी, अशा शब्दात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या. यावेळी पटेल यांनी गोंदियाच्या विकासासाठी आवश्यक विविध मागण्याही केल्या.


यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, 'गोंदिया हे महत्वाचे शहर आहे. याचा विकास होणे गरजेचे असून बीर्शी एअरपोर्ट ते गोंदिया चारपदरी मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. तसेच शहराच्या चारही बाजूंनी रिंग रोड तयार करण्यात येणार आहे. राज्य सरकारनेही स्मार्ट गोंदियाच्या निर्मितीकरिता पुढाकार घ्यावा '.
 
पुढे गडकरी म्हणाले, विदर्भातली कापूस बंगाल देशात जाईल तर विदर्भाचा विकास होईल, या दिशेने पुढील वाटचालीची गरज आहे. राज्य सरकारने गोंदियाच्या औद्योगिक परिसरात 200 एकर जागा उपलब्ध करुन दिल्यास येथे ड्राय फूड पार्क मध्ये मोठी गुंतवणूक केंद्र सरकारच्या माध्यमातून करतो असे आश्वासनही दिले.


भंडारा जिल्ह्यातून पेट्रोल हद्दपार करण्याचे माझे लक्ष्य असून तांदळापासून इथेनॉल तयार करण्याची आपली योजना आहे. शिवाय गोंदिया शहरातील पांगोली नदीमधील गाळ रस्त्याच्या निर्मितीसाठी वापरुन नदीचे पुनर्जीवीकरण करणार असल्याचेही ते म्हणाले. शिवाय रावनवाडी-गोंदिया मार्गाचे चारपदीकरण करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली.


 


हे वाचलं का


Navneet Rana : राणा दाम्पत्यासह 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, रात्री 10 नंतर लाऊड स्पीकर्स लावून नियमांचं उल्लंघन


Sanjay Raut : 'आमचं ठरलंय' म्हणणाऱ्यांच्या चाव्या आमच्याकडे, त्यांना घरी पाठवू; संजय राऊत यांचा सतेज पाटलांना इशारा


कधी काळी चोप दिलेल्या उत्तर भारतीयांचे आता राज ठाकरेंसाठी 'काय पण' ! म्हणाले, बृजभूषण सिंह मुंबईत आल्यास चप्पलचा हार घालणार