मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केलेल्या दिवसापासून वादाची मालिका सुरू झाली. उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर ते दररोज वेगवेगळ्या पद्धतीने राज ठाकरेंना इशारा देत राहिले. दौरात वादात आल्याने राज ठाकरेंना दौरा स्थगित केल्याची घोषणा केली. 


आता मुंबईमधील उत्तर भारतीय राज ठाकरेंसाठी चांगलेच आक्रमक झाले आहेत. ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात मुंबईत उत्तर भारतीयांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. ब्रिजभूषण यांचा निषेध करण्यासाठी आणि राज ठाकरे यांना समर्थन करण्यासाठी उत्तर भारतीयांनी मुंबईमधील साकीनाका मेट्रो स्टेशन खाली आंदोलन केले. 


जर अयोध्येला राज ठाकरे गेले, तर आम्ही देखील त्यांच्या सोबत जाणार आहोत आणि बृजभूषण मुंबईत आल्यास आम्ही चपलांचा हार घालणार अशी धमकीच या आंदोलनात देण्यात आली. आज आंदोलक बृजभूषण सिंह यांच्या फोटोला चपलांचा हार घालणार होते. मात्र, आधीच पोलिसांनी फोटो काढून घेतला आणि आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. 


गेली 14 वर्ष बृजभूषण झोपले होते का ? 


उत्तर भारतीय आंदोलन करताना चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. खासदार बृजभूषण सिंह उत्तर प्रदेशचे नाव खराब करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गेली 14 वर्ष ते झोपले होते का ? अशी विचारणा त्यांनी केली. त्यांच्या ताब्यात 14 कॉलेज आहेत. त्यामध्ये कोणाला नोकऱ्या दिल्या आहेत ? त्यामुळे आता बृजभूषण सिंह आमचे नाव खराब करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे बृजभूषण सिंह पुन्हा कधी मुंबईत आल्यास त्यांना पहिला चपलाचा हार आम्ही घालणार असल्याचा स्पष्ट इशारा मुंबईतील उत्तर भारतीयांनी दिला.


हे ही वाचलं का ?