रायगड : ऐन लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅ. ए. आर. अंतुले (A R Antulay) यांचे जावई आणि काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले (Mushtaq Antulay) लवकरच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुश्ताक अंतुले यांचा येत्या 23 एप्रील रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत (अजित पवार गट)  प्रवेश करणार आहेत, असे म्हटले जात आहे. 

अंतुले आणि तटकरे एकमेकांचे मित्र


मुश्ताक अंतुले हे सुनील तटकरे यांचे जवळचे मित्र आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळातही महत्त्वाची जबाबदारी पार पडलेली आहे. मुश्ताक अंतले आणि सुनिल तटकरे यांचे जवळचे संबंध आहे. अनेक कार्यक्रमानिमित्त या दोन्ही नेत्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे असते. असे असतानाच आता ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अंतुले राष्ट्रवादीत (अजित पवार गट) जाणार असल्याचे म्हटले जात आहे.  

काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून मुश्ताक यांची ओळख


राज्याचे आठवे मुख्यमंत्री स्वर्गवासी बॅ. ए. आर. अंतुले यांच्या निधनानंतर मुश्ताक अंतुले यांनी बॅरीस्टर अंतुले यांचा राजकीय वारसा सांभाळलेला आहे. मुश्ताक अंतुले हे काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जाता. गेल्या कित्येक वर्षांपासून ते काँग्रेसचे काम करत आहेत. मात्र आता अचानकपणे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा चालू झाली आहे. मुश्ताक यांनी अद्याप राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र मुश्ताक यांच्या निटवकर्तीयांकडून ते लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार असे सांगितले जात आहे.

अल्पसंख्याकांच्या मतासाठी तटकरेंचा डाव?


अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अनंत गीते यांना उमेदवारी दिलेली आहे. या निवडणुकीतील विजयासाठी तटकरे कंबर कसून प्रचार करत आहेत. आपली ताकद वाढावी यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यकर्त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये शेकाप, शिवसेना (ठाकरे गट) आदी पक्षातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मुश्ताक अंतुले हे अल्पसंख्याक समाजूतन येतात. अंतुले यांच्या प्रवेशामुळे रायगड मतदारसंघातील अल्पसंख्याक मतदार आपल्याकडे वळतील, अशी आशा तटकरे यांना वाटत असावी. त्यामुळे आगामी काळात तटकरे यांच्या राजकीय डावपेचाचा नेमका काय परिणाम होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

 

हेही वाचा :