नांदेड : आज परभणी, नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) सभा होणार आहे. नांदेड येथे सकाळी 10 तर परभणीत 12 वाजता पंतप्रधान मोदींची सभा पार पडणार आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात मोदींच्या नियोजित सभांच्या वेळेमध्ये बदल झाला असून आता परभणी ऐवजी नांदेड येथे त्यांची पहिली सभा होणार आहे त्यानंतर परभणीत सभा घेतली जाणार आहे.
नांदेड, परभणीत पंतप्रधानांची जाहीर सभा
पंतप्रधान मोदींच्या सभेच्या नियोजनासंदर्भात केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी परभणीत पत्रकार परिषद घेतली यावेळी माहिती देताना त्यांनी 20 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा नांदेडमध्ये येथे सकाळी 10 वाजता नांदेड येथील सभा घेऊन 12 वाजता परभणीमध्ये पोहोचतील आणि 12 वाजता परभणीतील सभा घेतली जाणार आहे. परभणीच्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असून परभणीची जागा निश्चितपणे महादेव जानकर हे दोन लाखांच्या मताधिक्याने जिंकतील, असा विश्वासही भागवत कराड यांनी व्यक्त केला आहे.
सकाळी 10.30 वाजता पंतप्रधानांचं आगमन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या सभेसाठी नांदेडमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी लाख लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून हजारो पोलिसांचा फौजफाटा नांदेडमध्ये तैनात करण्यात आला आहे. भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आज मोदींची सभा पार पडणार आहे. सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान मोदींचं नांदेड येथे आगमन होणार आहे.
परभणीत महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परभणीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. शहरातील लक्ष्मी नगरी या परिसरामध्ये ही सभा होणार असून सभेची तयारी पूर्ण झालेली आहे. भव्य दिव्य व्यासपीठ, तीन हेलिपॅड, मोठी आसन व्यवस्था अशी सर्वच तयारी पूर्ण झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती असणार आहे.
पाहा व्हिडीओ : बारशाला गेला आणि बाराव्याला आला, पंतप्रधान मोदींचा म्हणीतून काँग्रेसवर निशाणा
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Uddhav Thackeray : आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो, फडणवीसांचा शब्द; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा