नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण 31 मे रोजी जाहीर झाले. आरक्षणासंदर्भात हरकती व सूचना मागविल्यानंतर सोमवारी 13 जून रोजी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त आणि प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली.
12 मे रोजी निवडणूक आयोगाद्वारे प्रभाग रचनेचे अंतिम प्रारूप मंजुर करण्यात आले. त्यानंतर 31 मे रोजी प्रभागांच्या आरक्षणाची ईश्वरचिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. यानंतर 1 जून 6 जून पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. 


शहराची लोकसंख्या 'एवढी'


2019च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या 24,47,494 एवढी आहे. यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 4,80,759 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1,88,444 एवढी आहे. नागपूर शहराची 52 प्रभागामध्ये विभागणी करून त्रिस्तरीय प्रभागरचना करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण सदस्यसंख्या 156 एवढी आहे. 


78 जागा महिलांसाठी राखीव


यापैकी 50 टक्के अर्थात 78 जागा महिलांसाठी राखीव ठरलेल्या आहेत. अनुसूचित जातीकरिता एकूण 31 जागा आरक्षित असून त्यातील 16 जागा महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत. अनुसूचित जमातीकरीता 12 जागा राखीव असून त्यापैकी 6 जागा महिलांकरिता राखीव आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 113 जागा असून त्यातील 56 जागा महिलांसाठी राखीव आहेत.


'भावी उमेदवार' झाले प्रगट


संबंधीत प्रभाग आपला प्रभाव आहे. आपल्याला लोकांमध्ये समर्थन मिळणार हे पक्षाश्रेष्ठींसमोर दाखविण्यासाठी अनेक वर्षांपासून लुप्त असलेले भावी उमेदवार अखेर प्रगट झाले आहे. तसेच नागरिकांची विचारपूस करण्यास सुरुवात केली आहे. विद्यमान नगरसेवकही आजकल प्रभागात दर्शन देत असल्याने नागरिकही धक्क्यात असल्याची चर्चा आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


NMC Elections 2022 : यंदाही हजारो मतदानाला मुकणार; कार्यकर्त्यांकडे दिलेल्या वोटिंग कार्ड नोंदणी अर्जांचे काय?


Nagpur : तीन वर्षात तीनशे कोटी वर कर्जाची परतफेड, कर्ज फेडणाऱ्या मध्ये बचत गट प्रमाणिक


Congress :शेकडो कार्यकर्ते ईडी कार्यालयाच्या दाराकडे धावले, पोलिसांसोबत कॉंग्रेस कार्यकर्त्यांची धक्काबुक्की, नागपुरात गोंधळ