नागपूरः एकीकडे मोठे उद्योजक, कंपन्यांकडून बँकांचे कर्ज बुडविण्यात येत असल्याच्या बातम्या कानावर पडत असतात. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील महिलांचे बचतगट हा पैसा प्रामाणिकपणे परत करत आहे. नागपूर जिल्ह्यात मागिल तीन वर्षात महिला बचत गटांना जवळपास 302 कोटीवरचे कर्ज वितरित करण्यात आले असून त्यांनी शंभर टक्के कर्जाची परतफेड केली आहे. त्यामुळे इतरांपेक्षा हे बचत गट अधिक विश्वासपात्र ठरत आहे.


जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत (डीआरडीए) ग्रामीण भागातील महिला बचत गटांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना कर्जाचा पुरवठा करण्यात येतो. त्यातून लहान-मोठ्या उद्योगाची उभारणी करुन ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिल्या जातो. त्याचबरोबर गरजा भागविण्यासाठी बचत गटांना कर्ज पुरवठा करण्यात येतो. नागपूर जिल्ह्यात 17 हजारांवर नोंदणीकृत बचत गटांची संख्या आहे. 2019-20 मध्ये जिल्ह्यातील 4373 महिला स्वयंसहायता समूहांनी 59 कोटी 94 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. वर्ष 2020-21 मध्ये 6576 गटांनी 82 कोटी 6 लाखांचे तर वर्ष 2021-2022मध्ये 9151 बचत गटांनी 160 कोटी 8 लाखांचे कर्ज घेतले होते. बचत गटांनी या तिन्ही वर्षांमध्ये घेतलेल्या एकूण 302 कोटी 9 लाखांवरील कर्जाच्या रकमेपैकी 99 टक्क्यांवर कर्जाची परतफेड केल्याची माहिती डीआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.


जिल्ह्यातील 450 खाते एनपीए


नियमित कर्जाचे हप्ते भरणाऱ्यांना शासनातर्फे सुमतीबाई सुकळीकर व्याज अनुदान योजनेचाही लाभ दिल्या जातो. जिल्ह्यातील 450 बचत गटांनी बँकेकडून कर्ज घेतले परंतु त्यांची परतफेड केली नसल्याने बँकांनी त्यांचे खाते एनपीए केले आहे.


महिलांना रोजगार


बचत गटांच्या माध्यमातून महिला उद्योजिका झाल्या आहेत. त्यांनी अनेक व्यवसाय सुरू केले. यातून ग्रामीण भागातील महिलांनाही रोजगार मिळाला. घरासोबत गावही सक्षम करण्यास मदत होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


शेकडो कार्यकर्ते ईडी कार्यालयाच्या दाराकडे धावले, पोलिसांसोबत कॉंग्रेस कार्यकर्त्यांची धक्काबुक्की, नागपुरात गोंधळ


मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर उद्घाटनापूर्वीच भरधाव वाहतूक, बुलढाण्याजवळ रात्री झालेल्या अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी