Nagpur News नागपूर : "वसुली वृत्ती" अशा आशयाचे होर्डिंग नागपुरात (Nagpur News) लावून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना तुरुंगात दाखवणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना टार्गेट केले आहे. अनिल देशमुख यांनी आमच्या नेत्यांवर खोटे आरोप केले तर पुन्हा त्यांच्या विरोधात अशी कृती करू आणि आंदोलन करू, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाने दिला आहे.
आजी-माजी गृहमंत्र्यांच्या आरोपानंतर नागपुरात बॅनर युद्ध
नागपूरच्या रामनगर परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष बादल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस विकासाचा आग्रह धरणारे नेते आहेत. तर अनिल देशमुख वसुली वृत्तीचे नेते आहे अशा आशयाचा होर्डिंग लावले होते. त्यानंतर या होर्डिंगची एकच चर्चा शहरातील राजकीय वर्तुळासह नागरिकांमध्ये रंगली होती. तर दुसरीकडे या प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष बादल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह होर्डिंग कंपनीच्या व्यवस्थापकाच्या विरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज पुन्हा एकदा समोर येऊन अनिल देशमुख यांनी आमच्या नेत्यांवर खोटे आरोप केले, तर पुन्हा एकदा त्यांचे होर्डिंग शहरभर लावू, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आजी-माजी गृहमंत्र्यांच्या आरोपानंतर नागपुरात आता बॅनर युद्ध रंगलं असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पोलीसात तक्रार
नागपूरच्या रामनगर चौकावर अनिल देशमुख यांच्या संदर्भात बदनामीकारक होर्डिंग लावले होते. आता या प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष बादल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह होर्डिंग कंपनीच्या व्यवस्थापकाच्या विरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल रविवारच्या सकाळी रामनगर चौकावर अनिल देशमुख यांच्या संदर्भात बदनामीकारक होर्डिंग लावण्यात आले होते. त्याच्यामध्ये अनिल देशमुख बद्दल वसुली बुद्धी असा संदर्भ लिहून त्यांना तुरुंगात दाखवण्यात आले होते.
त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी संपूर्ण घटनेची शहानिशा करून संबंधित होर्डिंग काढायला लावले आहे. तसेच भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे हे वर्डिंग लावण्यात आल्यामुळे भाजयुमोचे शहराध्यक्ष बादल राऊत यांच्यासह इतर सहकारी तसेच होर्डिंग कंपनीच्या व्यवस्थापका विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या