वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सध्या आरक्षण बचाव यात्रेवर आहेत. आपल्या या यात्रेच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधत आहेत. 4 ऑगस्ट रोजी एका सभेत बोलताना त्यांना ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोक आहे. कुणबी मराठा उमेदवाराला ओबीसींनी मतदान करू नये, असे प्रकाश आंबेडकर आंबेडकर म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आता आंबेडकर यांनी शिवसेना पक्षावर मोठं विधान केलं आहे.  


शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो


"उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला तर समजेल की एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट सरळसरळ डबल आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की शिवसेनेची मतं एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली आहेत. आता शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो आहे. उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा आरक्षणवादी आणि मुस्लीम यांच्यामुळे वाढला आहे," असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसवरही टीका 


आरक्षणवादी आणि मुस्लीम हे दोन्ही धर्मवादी पक्षाचे मतदार नाहीत. त्यामुळे काँग्रेसला कणा असता तर त्यांनी हे त्यांच्या बैठकीत मानलं असतं. पण काँग्रेसमधला एकही नेता हे मानायला तयार नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. 


आंबेडकर यांची राज ठकरे यांच्यावर टीका


गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर हे आरक्षण बचाव यात्रेवर आहेत. आपल्या या यात्रेत ते मराठा, ओबीसी आरक्षणावर भूमिका मांडताना दिसत आहेत. याच यात्रेदरम्यान एका सभेत बोलताना त्यांनी कुणबी मराठा समजाच्या उमेदवाराल मतदान देऊ नका. ओबीसी आरक्षण 100 टक्के धोक्यात आहे, असे विधान केले. दुसरीकडे त्यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. राज ठाकरे यांच्यावर टाडा कायद्यानुसार कारवाई करायला हवी, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. आंबेडकर यांच्या मराठा, ओबीसी आरक्षणावरील भूमिकेवर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. आता त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. त्यामुळे आता मनसेचे नेते आंबेडकर यांच्या विधानावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


हेही वाचा :


राज ठाकरेंवर टाडा लागला पाहिजे, त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे; प्रकाश आंबेडकर कडाडले


मराठ्यांचा प्रश्न वेशीवर टांगण्यासाठी जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात, प्रकाश आंबेडकर म्हणाले..


कुणबी मराठा खरे ओबीसी नाहीत, ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका- प्रकाश आंबेडकर