दक्षिण मुंबईत दोन शिवसैनिक भिडणार, शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांचं नाव जवळपास निश्चित, ठाकरेंच्या अरविंद सावंत यांच्याशी लढत
Yamini Jadhav Vs Arvind Sawant : यामिनी जाधव या शिवसेनेच्या घाटकोपर मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत.
मुंबई : दक्षिण मुंबईतून महायुतीकडून कोण उमेदवार असणार याचा तिढा आता जवळपास सुटला आहे. दक्षिण मुंबईतून शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत यामिनी जाधव यांच्या नावाला पसंती मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या अरविंद सावंत (Arvind Sawant) विरूद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव असा सामना होण्याची शक्यता आहे.
यामिनी जाधव या शिवसेनेच्या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. मुंबईतील काही मतदारसंघातील उमेदवार अद्याप महायुतीने जाहीर केलेले नाहीत. त्यापैकी दक्षिण मुंबईच्या जागेचा समावेश आहे.
सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या घरी दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये यामिनी जाधव यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
राहुल नार्वेकरांची तयारी सुरू
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून दक्षिण मुंबईतून भाजपच्या राहुल नार्वेकरांनी तयारी सुरू केली होती. भाजपचेच मंगलप्रभात लोढा यांच्या नावाचीही या ठिकाणी चर्चा होती. दक्षिण मुंबईत मराठी भाषकांची असलेली संख्या लक्षात घेता भाजपकडून राहुल नार्वेकर हेच उमेदवार असतील अशी शक्यताही होती. पण आता शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
कोण आहेत यामिनी जाधव? (Who Is Yamini Jadhav)
सध्या शिंदे गटात असलेल्या यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या (Byculla MLA Yamini Jadhav) आमदार आहेत. एकेकाळी ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असलेल्या यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या त्या पत्नी आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांची ईडी चौकशी सुरू झाली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर यशवंत जाधव यांनी शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला.
नगरसेविका ते आमदार असा प्रवास (Byculla Assembly Election Results 2019)
यामिनी जाधव या 2012 साली मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी महापालिकेत विविध समित्यांवर काम केलं आणि आपली छाप उमटवली. भायखळा विधानसभा मतदारसंघ हा तसा मुस्लिमबहुल मतदारसंघ. 2014 सालच्या निवडणुकीत या ठिकाणाहून एमआयएमच्या वारिस पठाण यांनी बाजी मारली होती. त्यामुळे 2019 सालच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच असा चंग बांधलेल्या शिवसेनेने यामिनी जाधव यांना तिकीट दिलं. पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत यामिनी जाधव यांनी वारिस पठाण यांना पराभूत करत विधानसभेत प्रवेश केला.
ही बातमी वाचा: