मुंबई :  भाजपच्या (BJP)  मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी मविआ सरकारने (Maha Vikas Aghadi)  केली होती असा गौप्यस्फोट टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)  केलाय.  देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रविण दरेकरांना  खोट्या केसेसमधे अडकवून त्यांना अटक करण्याचं षडयंत्र रचल होतं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे. एवढेच नाही तर 2024 च्या निवडणुकांपूर्वी भाजपचे काही आमदार फोडण्याचाही प्लान होता, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.


एकनाथ शिंदे म्हणाले,  मविआ सरकारमध्ये मला खूप अपमानास्पद वागणूक मिळाली. आदित्य ठाकरेंचा माझ्या खात्यात खूप हस्तक्षेप होता. राज्यसभा उमेदवार निवडीत मला बाजूला ठेवून कहर केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी मला कायमच डावलले आहे. माझ्या नगरविकास खाते असताना मला कधीच स्वतंत्रपणे काम करु दिले नाही. कायम ठाकरे कुटुंबाकडून हस्तक्षेप होत होता.  मला कधीही स्वतंत्रपणे काम करू दिले गेले नाही. आदित्य ठाकरे कायमच ढवळाढवळ करत होते.   नगरविकास, एमएमआरडीए, सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठकांना ते उपस्थित राहायचे. शिवसेनेतून बाहेर  पडण्यापूर्वी माझ्याकडून नगरविकास खाते काढून घेण्याचा ठाकरेंचा डाव होता.  मला  नक्षलवाद्यांकडून धमकी असूनही  त्यांनी मला Z+ सुरक्षा दिली नाही. 


सुरतला जाताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिली ऑफर  (Eknath Shinde On Uddhav Thackeray Offer) 


सुरतला जाण्याअगोदर एकनाथ शिंदेंना  मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती या विषयी बोलताना  एकनाथ शिंदे म्हणाले,    मी सुरतला जाताना वसईतल्या एका चहाच्या टपरीवरुन उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. पण वेळ निघून गेलीय असे मी सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिल्लीतल्या भाजप नेत्यांना फोन करुन आपण पुन्हा एकत्र येऊ, एकनाथ शिंदेंसोबत का जाताय असे म्हटले, पण तोपर्यंत पुलाखालून खूप पाणी गेले होते.


शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी  उद्धव ठाकरेंचे नाव सुचवले नव्हते : मुख्यमंत्री (Eknath Shinde On Sharad Pawar) 


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी  मुख्यमंत्रीपदासाठी  उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इन्कार केला. उलट ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री करणार असल्याचे सांगितले होते, असे ते म्हणाले. जेव्हा महाविकस आघाडी सरकार स्थापन होत होते, तेव्हा मला मुख्यमंत्री केले जाईल या अपेक्षेने मला आणखी पोलिस बंदोबस्त मिळाला होता.  परंतु नंतर शरद पवार यांनी मला सांगितले की, ठाकरेंकडून आलेल्या लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस केली होती.  त्यांनीच शरद पवारांना उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्याची विनंती केली होती.


उद्धव ठाकरेंना किंगमेकर नाही तर किंग बनण्याची इच्छा : एकनाथ शिंदे


उद्धव ठाकरेंचे स्वप्न मुख्यमंत्री बनण्याचे होते. महाविकास आघाडीची  स्थापना ही पूर्वनियोजित कट होती. वडिलांसारखे किंगमेकर होण्याऐवजी उद्धव यांना स्वतः राजा व्हायचे होते, असे शिंदे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या इंग्रजी वृत्तपत्रातील मुलाखतीत काही नव्या गोष्टी देखील समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,   शिवसेना 16 जागा लढवणार, मुंबईतल्या तीन असणार. म्हणजे उरलेल्या 6 पैकी पाच जागा शिवसेनेलाच मिळणार आहे.  


आदित्यच्या मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मी अडथळा : एकनाथ शिंदे (Eknath Shinde On Aaditya Thackery CM) 


 उद्धव ठकरेंच्या आदित्यला मुख्यमंत्री बनवण्याच्या गौप्यस्फोटावर देखील मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.   उद्धव ठाकरे एका मुलाखतीत म्हणालेत, 2019 ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीला जाईल, असा शब्द देवेंद फडणवीस यांनी मला दिला होता, असं दावा उद्धव ठाकरे यांनी केला.  या विषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले,  आदित्यच्या मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मी अडथळा ठरेन, असे त्यांना वाटत होते. पण त्यांना आदित्य बनवण्याची घाई होती.  


 उमेदवार बदलणे ही पक्षाची अंतर्गत बाब : एकनाथ शिंदे (Eknath Shinde On Bhavana Gawali)


सेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना तिकिट नाकारण्यात आले याविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले,  उमेदवार बदलणे ही पक्षाची अंतर्गत बाब होती. भाजपने आम्हाला उमेदवार बदलण्यास सांगण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेनेचा राज्यात 16 जागा लढवण्याचा मानस असून, मुंबईत तीन जागा आहेत. 


हे ही वाचा :


बारामतीत दगाफटका झाला, सुनेत्रा पवार हरल्या तर तुमचं राजकीय करिअर धोक्यात येईल? अजित पवार म्हणाले...


Video :