रत्नागिरी: आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड हे दोन कोकणातील मतदारसंघ कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले. कोकणातील हे मतदारसंघ जिंकणे, हे महायुती आणि महाविकास आघाडीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सध्या कोकणात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवले आहे. गेल्या काही काळापासून भास्कर जाधव हे कोकणात पूर्वीसारखे सक्रिय नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाचे निरीक्षण समोर आले आहे.


भास्कर जाधव हे कोकणातील महाविकास आघाडीच्या प्रचारात नेहमीच्या हिरीरिने भाग घेताना दिसत नाहीत. गुहागर विधानसभा मतदारसंघातील चारही सभांना भास्कर जाधव यांनी दांडी मारली आहे. घरी पुतण्याची हळद उतरणी असल्याचे कारण पुढे करत भास्कर जाधव यांनी पुढे केले आहे. जाधव यांनी अनंत गीते यांच्या प्रचाराकडेही सपशेल पाठ फिरवल्याची कुजबुज ठाकरे गटात सुरु आहे. त्यामुळे भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. यामागील नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. 


रायगडच्या राजकारणातून सुनील तटकरेंना कायमचा हद्दपार करणार - अनंत गीते


रायगड लोकसभा मतदारसंघातील खेडमध्ये इंडिया आघाडीची सभा पार पडली. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या होमग्राउंड वर पार पडलेल्या सभेत उबाठा गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी या सभेत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ज्या माणसाने तटकरेंना राजकीय जन्म दिला त्या अंतुलेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सुनील तटकरे यांनी राजकारण मोठं करणाऱ्या शरद पवार यांच्या उतरत्या वयात त्यांचे घर फोडण्याचे पाप केले आहे. अशा सुनील तटकरेंना रायगडच्या राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी टीका अनंत गीते यांनी केली. या निवडणुकीत कितीही पैशाचे प्रलोभने दाखवली तरीही पापाच्या पैशाची माती करून टाकू, असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे. दरम्यान अनंत गीते यांनी रामदास कदम यांच्यावर देखील जहरी शब्दात टीका केली. रामदास कदम यांचे वय झाल्यामुळे काहीही बोलत असतात. पुढच्या काळात त्यांच्या घरातून कोणीही निवडणुकीला उभे राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करून त्यांना कायमचे बेदखल करू, असा इशाराही अनंत गीते यांनी दिला.


विनोद तावडे रत्नागिरीत येणार?


भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे 24 एप्रिलला रत्नागिरीमध्ये प्रचारासाठी येणार आहेत. विनोद तावडे आणि नारायण राणे  रत्नागिरीतील  300 ते 400 नामांकित व्यक्तींशी साधणार संवाद साधतील. तर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, लांजा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी  राणे आणि तावडे साधणार संवाद साधणार आहेत.


आणखी वाचा


ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; आदेश बांदेकर, भास्कर जाधव, सुषमा अंधारेंसह 40 जणांचा समावेश