मुंबई : भारतीय जनता पार्टीत (BJP) प्रवेश करावा, असं मला वाटत नव्हतं. पण, काही भारतीय जनता पार्टीमधील ज्येष्ठ पदाधिकारी, दिल्लीमधील भाजपच्या अतिउच्चपदावरील मंत्र्यांनी मला फोन करून तुम्ही भाजपमध्ये या, असे सांगितल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी माझा कट्ट्यावर (ABP Majha Katta) केला आहे. 


गेल्या काही महिन्यांपासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे चांगलेच चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. मात्र अनेक दिवसांपासून त्यांचा भाजप प्रवेश रखडला होता. त्यामुळे एकनाथ खडसे नक्की भाजपमध्ये प्रवेश कधी करणार? असा चर्चा रंगलेल्या असतानाच त्यांनी खळबळजनक दावा केला होता. भाजपमध्ये (BJP) जे पी नड्डा (J P Nadda) यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला होता, तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे होता. मात्र मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोध केल्याने तो जाहीर झाला नाही, असे त्यांनी म्हटले होते. आता एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय का घेतला होता? याबाबत माझा कट्ट्यावर पडद्यामागचे राजकारण सांगितले आहे. 


दिल्लीतील बड्या नेत्याचा मला फोन : एकनाथ खडसे


एकनाथ खडसे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीत प्रवेश करावा, असं मला वाटत नव्हतं. पण, काही भारतीय जनता पार्टीमधील ज्येष्ठ पदाधिकारी, दिल्लीमधील अतिउच्चपदावरील मंत्र्यांनी मला फोन केला. तुम्ही राष्ट्रवादीत काय करत आहात. राष्ट्रवादी संपली आहे. शरद पवार साहेबांचे आता काहीच राहिले नाही. तुम्ही भाजपमध्ये या. अशी सूचना त्यांनी मला केली होती. 


'ते' नेते नेमके कोण? 


त्यामुळे मी त्यावेळी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना सांगितले की, मला विचार करायला जरा संधी द्या. पण, नंतर त्यांच्यापेक्षा आणखी एका वरिष्ठ नेत्याचा मला फोन आला. त्यांनी म्हटलं की, तुम्ही का वाट पाहत आहात. भाजपमध्ये प्रवेश करा, असे सांगितल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. हे नेते कोण असे विचारले असता, ते मी सांगू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी यावेळी दिली. 


आणखी वाचा


Eknath Khadse on Majha Katta : एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...