मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रत्येकी तीन पक्ष असल्याने जागावाटप कसे होणार, याविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. एकीकडे भाजपकडून पितृपक्षानंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता असताना महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत (MVA seat Sharing) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार गणेशोत्सव (Ganesh Utsav 2024) संपल्यानंतर मविआच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.


महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांवरुन जागावाटपाचे घोडे अडले आहे. हा तिढा  महाविकास आघाडी गणेशोत्सवानंतर सोडवेल, अशी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील एकूण 36 मतदारसंघांपैकी शिवसेना ठाकरे गट 20, काँग्रेस 18, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 7 जागांवर आग्रही आहे. 


महाविकास आघाडीतील  काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात सहा जागांवरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील तीन जागांसाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत. यामध्ये कुर्ला, वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम या मतदारसंघांचा समावेश आहे. 


महाविकास आघाडीत मुंबईतील कोणत्या जागांसाठी कोणता पक्ष आग्रही ? 


शिवसेना ठाकरे गट आग्रही असलेल्या 20 जागा


१)शिवडी 
२)भायखळा 
३)वरळी 
४)माहीम 
५)चेंबूर 
६)भांडुप पश्चिम 
७)विक्रोळी 
८)मागाठाणे 
९)जोगेश्वरी पूर्व 
१०)दिंडोशी
११)अंधेरी पूर्व 
१२) कुर्ला 
१३) कलिना 
१४) वांद्रे पूर्व 
१५) दहिसर 
१६) वडाळा 
१७) घाटकोपर पश्चिम 
१८) गोरेगाव 
१९) अणुशक्ती नगर  
२०)वर्सोवा 


काँग्रेस मुंबईतील कोणत्या 18 विधानसभा मतदारसंघांसाठी आग्रही 


१) धारावी 
२)चांदिवली 
३) मुंबादेवी 
४) मालाड पश्चिम 
५)सायन कोळीवाडा 
६)कुलाबा 
७)कांदिवली पूर्व 
८)अंधेरी पश्चिम 
९) वर्सोवा 
१०)वांद्रे पश्चिम  
११) घाटकोपर पश्चिम 
१२) कुर्ला 
१३) भायखळा 
१४) जोगेश्वरी पूर्व 
१५) मलबार हील 
१६) माहीम 
१७) बोरीवली 
१८)चारकोप 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आग्रही असलेल्या 7 जागा 


१) अणुशक्ती नगर 
२) घाटकोपर पूर्व 
३) घाटकोपर पश्चिम 
४) वर्सोवा  
५)कुर्ला 
६) अंधेरी पश्चिम  
७) दहिसर 


 समाजवादी पक्ष


१) शिवाजीनगर मानखुर्द 


काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात या सहा जागांवरुन रस्सीखेच


1)भायखळा 
2)कुर्ला 
3) घाटकोपर पश्चिम
4)वर्सोवा 
5) जोगेश्वरी पूर्व 
6) माहीम 


मुलुंड, विलेपार्ले, बोरिवली, चारकोप, मलबार हिल  या पाचपैकी काही जागांवर अद्याप कोणत्याही पक्षाने दावा सांगितलेला नाही.  या जागांबद्दल अद्याप कुठलीही चर्चा महाविकास आघाडीच्या बैठकीत झालेली नाही. काँग्रेस पक्षाने २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी असताना २९ तर राष्ट्रवादी काँग्रेसने सहा आणि समाजवादी पक्षाने एक जागा लढली होती. 


तर शिवसेना पक्ष भाजप सोबत युतीत असताना 2019 मध्ये  मुंबईतील 19 जागा लढला होता. ज्यामध्ये 14 जागी शिवसेना पक्ष विजयी झाला होता. शिवसेना पक्ष फुटीनंतर या 14 पैकी आठ आमदार ठाकरेंसोबत आहेत तर सहा आमदार शिंदे सोबत आहेत.



आणखी वाचा


ठाकरे गट 20 ते 22 जागांसाठी आग्रही, शरद पवार गट सात जागांसाठी उत्सुक; मविआ मुंबईतील तिढा कसा सोडवणार?