Jyoti Mete : आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) शिवसंग्राम पक्ष (Shiv Sangram Party) देखील आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती शिवसंग्राम पक्षाचा प्रमुख ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी दिली. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यासह अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यासोबतही आमची बोलणी सुरु असल्याचे ज्योती मेटे म्हणाल्या. ज्योती मेटे स्वतः बीड (Beed) मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. 


शिवसंग्राम पक्ष कोणत्याही परिस्थितीत विलीन करणार नाही


दरम्यान, ज्योती मेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसंग्राम पक्ष कोणत्याही परिस्थितीत विलीन करणार नाही. शिवसंग्राम पक्ष म्हणून निवडणूक लढण्यावरच आमचा भर असल्याचे ज्योती मेटे म्हणाल्या.


शिवसंग्राम किमान 5 विधानसभा जागा लढवणार


मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम किमान 5 विधानसभा जागा लढवणार आहे. दरम्यान, मागील महिन्यात पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मेटे यांनी महत्वाची माहिती दिली हती. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांशी आमची चर्चा सुरू आहे. मुंबई कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पाच विभागात पाच जागा पाहिजेत असंही यावेळी ज्योती मेटे यांनी म्हटलं होतं. ज्योती मेटे स्वतः निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे.तर बीडमधून त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. आम्ही निवडणुका ज्या ठिकाणी जिंकेल असं वाटतं त्याच ठिकाणी लढवणार असल्याची माहिती त्यांंनी यावेळी दिली आहे. आज मनोज जरांगे पाटील याची राजकीय भूमिका ठरली नाही अजून त्यामुळे त्यांच्याशी बोलणी झाली नाही, आम्ही बोलणी सगळ्यांशी बोलणार आहोत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 


लोकसभा निवडणुकीत ज्योती मेटे यांनी कोणालाच पाठिंबा दिला नाही


दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील ज्योती मेटे यांचे नाव चर्चेत होते. लोकसभा निवडणुकीच्या रिंगण्यात उतरण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. मात्र, लोकसभा निवडणूक न लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्योती मेटे यांनी शरद पवार, देवेंद्र फडणवीस या नेत्यांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी कोणालाच जाहीर पाठिंबा दिला नव्हता. आता मात्र, यावेळी ज्योती मेटे विधानसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. त्या स्वत:निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्या महाविकास आघाडीबरोबर जाणार की महायुतीबरोबर जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी : ज्योती मेटेंकडे शिवसंग्रामची धुरा; विधानसभा निवडणकीत 'इतक्या' जागा लढण्याचा केला निर्धार