Dhiraj Deshmukh on Vidhan Parishad Election, Mumbai : "विधानपरिषदेचीही शेवटी निवडणूक आहे, निवडणूक लढली पाहिजे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी लढली आणि यश मिळालं. आम्हाला विश्वास आहे की, तसाच निकाल विधानपरिषद निवडणुकीतही लागेल. येणाऱ्या विधानसभा निवडणुसाठीची ही पार्श्वभूमी ठरेल, असंही मला वाटतं", असे काँग्रेस आमदार धीरज देशमुख म्हणाले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचा विजय होईल असं ठणकावून सांगितलं.
नॅशनल बँकेत खातं उघडायचं असेल तर महिलांना अडचणी येतात
धीरज देशमुख म्हणाले, लाडकी बहीण योजना सरकारने आणली, त्यामध्ये एक अट ठेवली होती की, बँकेत अकाऊंट असले पाहिजे. आपण या योजनेचा अभ्यास केला तर लक्षात येईल ही फार गरीब वर्गासाठी आणलेली योजना आहे. नॅशनल बँकेत खातं उघडायचं असेल तर महिलांना अडचणी येतात. पावसाळ्याचे दिवस आहेत, मुलांच्या शाळा सुरु आहेत. घरकाम सोडून योजनेसाठी महिलांना वेळ द्यावा लागला, तर अडचणी येतात.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सभागृहात चर्चा व्हायला हवी
मनोज जरांगेंची प्रत्येक जिल्ह्यामध्ये शांतता रॅली सुरु आहे. सरकारने त्यांना सांगितलंय की, 13 जुलैपर्यंत याबाबतचा निर्णय घेणार आहोत. त्यामुळे जी चर्चा होणे अपेक्षित आहे, ती अधिवेशनात होणे अपेक्षित आहे. सह्याद्री अतिथी गृहामध्ये चर्चा करुन उपयोग नाही. याबाबत सभागृहात एकदिवसीय चर्चा व्हायला हवी. महाराष्ट्राला पुरस्कार मिळतोय म्हणून आनंद आहे, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे? असा सवालही धीरज देशमुख यांनी व्यक्त केला.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार सध्या रिंगणात आहेत त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) मतांची फाटाफूट होण्याची दाट शक्यता आहे. ही फाटाफूट रोखण्यासाठी आता सर्वच पक्षांनी खबरदारी घेतल्याचं पाहिला मिळत आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जो तो आपली व्यवस्था करत असतो. विधान परिषद निवडणूक आहे.
महायुतीकडे 200 तर मविआकडे 65 आमदार, विधानपरिषद निवडणुकीत NCP ला 4 तर ठाकरे गटाला 8 मतांची गरज
सध्या महायुतीकडे एकूण 200 आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडे 65 आमदार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वबळावर आपले उमेदवार निवडूण आणायचे असतील तर अजुन 4 मतांची गरज आहे तर ठाकरे गटाला आपला उमेदवार निवडून आणायचा असल्यास 8 मतांची गरज आहे. भाजपला आपले 4 उमेदवार स्वबळावर निवडून आणता येऊ शकतात. माञ पाचवा उमेदवार निवडून आणायचा असेल तर त्यांना देखील स्वतःची 8 मते असणं गरजेचं आहे. सूत्रांचा माहितीनुसार प्रत्येक पक्षाला आपली मतं स्वतः गोळा करावी लागणार आहेत.
इतर महतवाच्या बातम्या