Yogendra Yadav and Tushar Gandhi, Wardha : "आमचा दुसरा प्रस्ताव आगामी कार्यक्रमांबाबत आहे. आम्ही नवा संकल्प केला आहे की, काही महिन्यांमध्ये चार राज्यात विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) आहे. तिथे आम्ही खुलेपणाने इंडिया आघाडीचे समर्थन करणार आहोत. देशातील इतर ठिकाणी आम्ही कार्यकर्ता निर्माण आणि विचारांच्या प्रसारासाठी आम्ही सर्व जनआंदोलनांसोबत संवाद साधणार आहोत. संविधान वाचवण्यासाठी स्वंयसेवकांची टीम तयार करणार आहोत", असे भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव  (Yogendra Yadav)  म्हणाले. योगेंद्र यादव आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी वर्ध्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 


भारत जोडो यात्रेच्या राष्ट्रीय अधिवेशनात पदाधिकाऱ्यांची निवड


योगेंद्र यादव म्हणाले, आम्ही दोन मोठे संकल्प केले आहेत, प्रस्ताव मंजूर केले आहेत. पहिला संकल्प देशाच्या राजकारणाबाबत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आम्ही संतोष व्यक्त केला आहे. आम्ही लोकशाही आणि संविधानाला विरोध करणाऱ्या आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विरोधात असणाऱ्यांना एक झटका दिलाय, पण आम्ही चिंताही व्यक्त करत आहोत, कारण अजूनही या लोकांचे आव्हान आमच्या समोर आहे.  यांच्याविरोधात दीर्घकाळ लढत राहावे लागणार आहे, असंही योगेंद्र यादव यांनी नमूद केलं. 


भारत जोडो यात्रेच्या राष्ट्रीय अधिवेशनात पदाधिकाऱ्यांची निवड


पुढे बोलताना यादव म्हणाले, भारत जोडो यात्रेच्या राष्ट्रीय अधिवेशनात पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय संजोजक म्हणून तीन लोकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मी योगेंद्र यादव, विजय महाजन आणि सुश्री कविता कुरुगंटी हे तीन राष्ट्रीय संयोजक असणार आहेत. याशिवाय तीन महासचिवही कार्यरत असणार आहेत. अजित झा, नदीम खान आणि अविक साहा हे तीन महासचिव असतील. याशिवाय राष्ट्रीय ट्रेजर आणि राष्ट्रीय सचिवाचीही निवड करण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येक राज्यात संमेलन होणार आहेत. त्यातून राज्यातील टीमही निवडण्यात येणार आहे, असेही योगेंद्र यादव यांनी सांगितले.


वर्ध्यात इंडिया आघाडीला वाव नाही, असं वाटत होतं, पण भारत जोडो अभियानच्या टीम फरक पडला 


तुषार गांधी म्हणाले, वर्ध्यात इंडिया आघाडीला वाव नाही, असं वाटत होतं, पण भारत जोडो अभियानच्या टीम कार्यरत झाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोठा फरक पडला. या पद्धतीने काही काही जागांवर फरक पाडून चांगलं आणि पूर्ण स्वरुप आलं. त्यांचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसला. 




इतर महत्वाच्या बातम्या 


Narayan Rane on Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवारांना काही कळत नाही, त्यांनी मी आमदार केलं; आरक्षणाच्या प्रश्नावरुन नारायण राणेंचा हल्लाबोल