Narayan Rane on Vijay Wadettiwar, Ratnagiri : "सत्ताधाऱ्यांनी सभागृह बंद पाडले. सरकारने दोन समाजात वाद निर्माण केलाय. मराठा आणि ओबीसी समाज सरकारने झुंजवत ठेवले आहेत. आरक्षणप्रश्नी आम्हा सर्वांना चर्चेसाठी बोलावलं होतं, पण सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना विश्वासात घेतले नाही", अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली होती. दरम्यान, रत्नागिरीत बोलताना खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी वडेट्टीवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 


नारायण राणे काय काय म्हणाले ?


विजय वडेट्टीवारांवर टीका करताना नारायण राणे म्हणाले, वडेट्टीवर यांना काही कळत नाही. त्यांना मी आमदार केले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीचं राज्य राज्यात परत येईल, असा दावाही नारायण राणे यांनी रत्नागिरीत बोलताना केलाय. मी मंत्री झालो नाही, याबाबतची निराशा फारकाळ टिकणार नाही, असंही नारायण राणे यांनी सांगितलं. 


रिफायनरीबाबत मी  ऐकणार नाही, कारण काहीही असोत माझ्या लोकांना रोजगार द्या


नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले, रिफायनरी होण्यासाठी वातावरण आम्ही तयार करू. समर्थनासाठी एक मोर्चा काढला जाईल. रत्नागिरी पर्यटन जिल्हा होण्यासाठी प्रयत्न करू. कोकणातले वातावरण मला देखील माहिती आहे. जगात देखील रिफायनरी आहे. यांना पैसे मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू आहे. कोळशापासून वीज निर्माण करणारे उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले, 50 कोटीची डील झाली आहे. रिफायनरीबाबत मी  ऐकणार नाही. कारण काहीही असोत माझ्या लोकांना रोजगार द्या, असं आवाहनही नारायण राणे यांनी सरकारला केलं.  


इकडे सगळ्यांना बघून घेणार  कोणाला सोडणार नाही : नितेश राणे 


साहेब तुम्ही दिल्ली सांभाळा, इकडे मी आणि कार्यकर्ते बघून घेऊ. इकडे सगळ्यांना बघून घेणार,  कोणाला सोडणार नाही. चिपळूणपासून सुरुवात केली आहे. रत्नागिरीमध्ये पण आलो आहे. ज्यांनी आपली वाट लावली त्यांना सोडणार नाही. मी वाट लावणार आहे. तुम्ही इकडे दुर्लक्ष करा. मी दिल्ली चकाचक करतो, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Lok Sabha Election Result LIVE : लोकसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी